Latest

दै. ‘पुढारी’तर्फे ‘चैत्रपालवी’ या कार्तिकी, कौस्तुभ गायकवाड यांच्या सुरेल गाण्यांचा कार्यक्रम

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'चैत्रपालवी वसंताची, उम्मीद नवी चैतन्याची, गुढी उभारू मांगल्याची प्रयत्नांची अन् प्रेमाची', असा संदेश घेऊन येणार्‍या गुढीपाडव्याच्या सणाची चाहूल सर्वांना लागली आहे. अशा या चैतन्यदायी ऋतूची सुरुवात अविस्मरणीय व्हावी, या उद्देशाने
दै. 'पुढारी'तर्फे 'चैत्रपालवी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांतर्गत मराठमोळी लिटील चॅम्प फेम गायिका कार्तिकी गायकवाड आणि गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांच्या सुश्राव्य गीतांचे सादरीकरण होणार आहे. तसेच सोहम जगताप यांच्या संतूर वादनाचा कार्यक्रमही होणार आहे. या सर्वांना संगीत साथ सचिन जगताप आणि सहकार्‍यांच्या वाद्यवृंदाची असणार आहे. शुक्रवार, दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ही सूर-तालाची मैफल रंगणार आहे. कार्यक्रमासाठी 'ग्रोबझ' या वित्त संस्थेचे विशेष सहकार्य लाभले आहे.

ग्रोबझ इंडिया अर्बन निधी लि. कोल्हापूर संस्था ग्राहकांच्या आर्थिक स्वप्नांना साकरण्यासाठी मदत करत आहे. सर्व सभासदांना पाठबळ देऊन आर्थिक सक्षम बनवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संस्थेच्या एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएससारख्या सर्व ऑनलाईन बँकिंग सेवा उपलब्ध असून गुढीपाडव्यापासून एटीएम सेवा सुरू होणार आहे. तसेच रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, लसीकरण, अन्नवाटप अशा कार्यांमधून संस्थेने सामाजिक हित जपले आहे.

मराठमोळ्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होते. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर जनजीवन पूर्वपदावर आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशात नववर्षाची पूर्वसंध्या यादगार बनविण्यासाठी दै. 'पुढारी' च्या वतीने 'चैत्रपालवी' या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका मंगळवारपासून (दि. 29 मार्च) 11 ते 6 या वेळेत टोमॅटो एफ.एम. ऑफिस, वसंत प्लाझा, पाचवा मजला, बागल चौक येथून घेऊन जाण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः 9765566377

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT