Latest

दै.‘पुढारी’ वर्धापनदिनी जनजागृती स्केटिंग रॅली

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी'ने 84 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 85 व्या वर्षांत पदार्पण केले. यानिमित्ताने विविध स्केटिंग संघटनांच्या वतीने जनजागृती स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून स्केटिंग रॅली टाऊन हॉल उद्यानातील स्नेह मेळाव्यात पोहोचल्यानंतर खेळाडूंचे स्वागत दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी केले. यावेळी अ‍ॅड. धनंजय पठाडे, जयेश ओसवाल आदी उपस्थित होते.

गडकोट-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती

इतिहासाचे मूक साक्षीदार असणार्‍या गडकोट-किल्ल्यांचे संवर्धन करा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांच्या जनजागृतीसाठी शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूल, राजर्षी शाहू स्केटिंग प्रशिक्षण केंद्रातर्फे जनजागृती स्केटिंग रॅली काढण्यात आली. दै. 'पुढारी'च्या वर्धापनदिनानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीत कल्प ओसवाल, राज ओसवाल, श्रेया चौगले, हर्षद कुंभार, प्रीती चौगुले, श्रेया चौगुले, श्लोक पटेल, सायली गायकवाड, सई गायकवाड, शौर्य देशमुख, प्रणित हाके, मोरेश्वर कदम, प्रेरणा भोसले, अनुष्का रोकडे, प्रिया रोकडे, वेद सोकाशे, आरुषा माजगावकर, धनुष माजगावकर, मित नागदेव, मयांक सॅमल, दर्शन नागदेव, आर्णव रोकडे, फाईम सय्यद, आरफान सय्यद, शौर्य कामत, श्रीशा जाधव, श्रवण जाधव, देवेंद्र कदम, विरश्री कदम, धनश्री कदम, तेजस्विनी कदम, ऐश्वर्या बिरंजे या खेळाडूंसह पालक बलराम जाधव, संजीवनी जाधव, अ‍ॅड. शशिकांत कामत, अ‍ॅड. योगिता कामत, शंकर चौगुले, मेघश्याम जगताप, संघमित्रा देशमुख, मोना पटेल, कविराज रोकडे, विजय कुंभार, किरण माजगावकर, करिष्मा सय्यद, झहिर सय्यद आणि प्रशिक्षक डॉ. महेश कदम, भास्कर कदम आदी उस्थ्थित होते.

प्रशिक्षक जयराम जाधव, तेजस्विनी जाधव व पालकांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीत प्रिंजल कुकडे, आयांश होळकर, विश्ववीर जाधव, रणवीर जाधव, सिंथिया डिकोस्टा, संस्कृती खंडागळे, राजवीर मोरे, जान्हवी अभिजीत कदम, तेजस्विनी आनंद पाटील, पार्थ खोत, आदिश जाधव, राजवीर पाटील, आराध्या भोसले, वेदिका देसाई, सार्थक पोद्दार, वैष्णवी पाटील आदींनी सहभाग घेतला.

लेक वाचवा – देश वाचवा

'लेक वाचवा, देश वाचवा' असा संदेश देणार्‍या दै. 'पुढारी'च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जे.जे. रोलर स्केटिंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. साळोखेनगर कळंबा ते टाऊन हॉल उद्यान असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीत वय 5 ते 18 वयोगटातील स्केटिंगपटूंनी सहभाग नोंदविला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT