बॉलीवूड आणि क्रिकेटचे खूपच जुने नाते आहे. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्यापासून ही सुरुवात झाली. आजही बॉलीवूडच्या तारका आणि टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूंमध्ये अफेअर असल्याच्या बातम्या येत असतात. यात विराट कोहली-अनुष्का शर्मासारखी काही रिलेशनशिप विवाहाच्या बोहल्यापर्यंत पोहोचतात, तर दीपिका पदुकोण – युवराज सिंगसारखा काही नाती मध्येच थांबतात. एकवेळ दीपिका आणि स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत अफेअर होते. काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. 2008 मध्ये दीपिका आणि युवराजचे अफेअर असल्याचे समाोर आले होते. टी-20 वर्ल्ड कपनंतर दोघांची ओळख झाली. त्यानंतर ते चांगले मित्र झाले आणि मैत्रीचे रूपांत प्रेमात झाले. युवराज दीपिकाबाबत खूपच संवेदनशील असल्याचे सांगितले जात होते. हीच बाब दीपिकाला अजिबात आवडत नव्हती. युवराज दीपिकाच्या प्रोफेशनल लाईफमध्येही हस्तक्षेप करायचा. त्यामुळे दोघांचा लवकरच ब्रेकअप झाला. दीपिकाने अभिनेता रणबीर कपूरसाठी मला सोडले, असे युवराजने इशार्यांमध्ये सांगितले होते. युवराजने एका मुलाखतीत या बद्दल खुलासा केला होता. दीपिका मला डेट करायची. पण तिने आयुष्यात दुसर्या व्यक्तीसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हा तिचा पर्सनल निर्णय होता.