लंडन : बर्याचवेळा माणूस जगातील घटना आणि आनंद देणार्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अनेकांना नैराश्याने ग्रासले जाते. त्यातून बाहेेर पडण्यासाठी अनेकांकडून अजब गजब मार्ग अवलंबला जातो. त्यामुळे अन्य लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. नुकतेच सोशल मीडियावरील एक प्रकरण सर्वांना आकर्षित करत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अशा काही पद्धतीचा वापर करतो, त्यामुळे लोकांचा यावर विश्वासच बसणार नाही.
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने जगातील सर्वाधिक धोकादायक रोपटे वाढवले आहे. या रोपट्याची माहिती ऐकून लोकांचा थरकाप उडेल. 'द इंडिपेंडेंट'च्या अहवालानुसार, ब्रिटनमध्ये 49 वर्षांच्या डॅनिअल एमलिन-जोन्स यांनी जगातील सर्वाधिक धोकादायक रोपटे उगवले आहे. त्याचा डंक खूपच धोकादायक तर आहेच, या रोपट्याने डंक मारल्यास माणसात आत्महत्या करण्याचा विचार येऊ शकतो.
डॅनिअल यांनी जिममाई-जिमपाई नावाचे रोपटे घरात उगवले असून त्याला पिंजर्यात ठेवले आहे. या रोपट्याला ऑस्टे्रलियन स्टिंगिंग नावानेही ओळखले जाते. या रोपट्याला सर्वाधिक विषारी मानले जाते. या रोपट्याने मारल्याने विजेचा धक्का अथवा शरीरावर अॅसिड पडल्यासारखे वाटते.