Latest

तुला टच करु का? झिम्बाब्वेमधील चाहतीच्‍या प्रश्‍नावर दीपक चहर भांबावला आणि पुढे…

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने झिम्बाब्वे दौर्‍यावर पहिल्या वन-डे सामन्यात जोरदार पुनरागमन केले. त्याने हरारे येथे झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात 27 धावा देत 3 विकेटस् घेतल्या. दीपकच्या या कामगिरीमुळे त्याचे झिम्बाब्वेमध्ये चाहते चांगलेच वाढले आहेत. स्थानिक पत्रकार, सुरक्षारक्षक, ग्राऊंड स्टाफची चहरसोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती. दरम्यान, झिम्बाब्वे संघातील क्रिकेटपटूच्या कुटुंबालादेखील दीपक चहरसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

यावेळी चहरच्या एका फिमेल फॅनने दीपक चहरला तुला टच करू का, असे विचारले. त्यानंतर तिने चहरच्या खांद्यावर हात ठेवत फोटो काढला. तर दुसर्‍या एका चाहतीने चहरसोबत संभाषण केल्यानंतर प्रतिक्रिया दिली की, 'आम्ही खूप आनंदी आहोत. तो खूप क्यूट आणि विनम्र आहेस.' दीपक चहरला देखील मोठ्या ब्रेकनंतर अशा प्रकारे फॅन्सचा सपोर्ट मिळाल्यामुळे आनंद झाला होता.

पहिल्या सामन्यातील चहरच्या दमदार कामगिरीवर भारतीयच नाहीत तर झिम्बाब्वेमधील क्रिकेटप्रेमीही खुश होते. यानंतर हरारे क्रिकेट मैदानावर उपस्थित स्थानिक पत्रकार, मैदानावरील कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी या सर्वांना चहरला जवळून पाहायचे होते. त्याचवेळी झिम्बाब्वेच्या एका क्रिकेटरचे कुटुंबीय दीपकसह सेल्फी घेताना दिसले. सेल्फी घेतानाचा हा व्हिडीओ आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, या महिला चाहतीवर चहरची भुरळ पडली आहे. ती चाहरला म्हणते की 'तू खूप क्यूट दिसताेस आहेस, मी तुला टच करू का? ' यावर दीपक चहर थोडा गोंधळला, मात्र नंतर त्याने होकार दिला. हाेकारानंतर ती चाहती त्याच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी घेताना दिसली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT