पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ठिपक्यांची रांगोळी', 'फुलपाखरु' अशा अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारा मराठमोळा अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋतुजा धारप यांनी आज २२ एप्रिल, २०२४ रोजी) लग्नगाठ बांधली. चेतन आणि ऋतुजाने इन्स्टाग्रामवर अधिकृत अकाउंटवर लग्नाचे फोटोज शेअर केले आहेत. फोटोमध्ये चेतनने जांभळ्या रंगाचे धोतर नेसलेले दिसत आहे. ऋतुजाने आकाशी आणि निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. (Chetan Vadnere-Rujuta Dharap Wedding)
सप्तपदीसाठी दोघांचा हा खास लूक तुम्ही पाहू शकता. आणखी एका फोटोमध्ये दोघे एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. यावेळी ऋतुजाने पिवळ्या – जांभळ्या रंगाची साडी तर चेतनने गोल्डन डिझाईन असलेला पांढरा अंगरखा आणि जांभळे धोतर परिधान केले आहे.
दोघांनी आपापल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिल आहे- 22.04.2024 ॥ कुर्यात सदा मंगलम् ॥