जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत, जे आपल्या बजेटच्या हिशेबात एकदम 'परफेक्ट' असतात. मात्र, काही देश असे आहेत जे आपला खिसा चांगलाच रिकामा करतात. अशा महागड्या देशांमध्ये हॉटेलांमध्ये राहणे, खाणे-पिणे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व काही महागडे आहे. विविध पाहण्यांमधून समोर आलेल्या अशाच काही महागड्या देशांची ही माहिती…
स्वित्झर्लंड
सर्वात महागड्या युरोपियन देशांपैकी एक असलेले स्वित्झर्लंड 'रिची रिच' लोकांची भूमी आहे. अत्यंत सुंदर निसर्ग असलेल्या या देशात लक्झरी रिसॉर्ट, महागडे शुल्क असलेली वाहतूक व्यवस्था आणि महागडे खाणे-पिणे आहे.
स्विडन
जर आपल्याला बँक बॅलन्स एकदमच रिकामा करायचा नसेल तर स्विडन 'परफेक्ट' आहे. अनेक कालवे असल्याने स्विडनमधील शहरांना उत्तरेतील 'व्हेनिस'ही म्हटले जाते. स्वीडन सांस्कृतिक रूपाने समृद्ध आहे; पण महागडेही आहे.
डेन्मार्क
हा देश जगभरातील पर्यटकांना आकर्षित करीत असतो. विशेषतः श्रीमंत पर्यटकांसाठी हा स्वर्गच आहे. मात्र, प्रत्येक टप्प्यावर हा देश महागडा असल्याचे लक्षात येऊ शकते. मुक्कामाचे ठिकाण, खाणे-पिणे, परिवहन अशा सर्वच बाबतीत इथे बराच खर्च करावा लागतो.
सिंगापूर
अत्यंत स्वच्छ, सुंदर व सुरक्षित असलेल्या सिंगापुरातही फिरणे महागडे ठरते. हा देश आपले महागडे ट्रान्सपोर्ट, खाणे-पिणे आणि हॉटेलबाबत ओळखला जातो.
युनायटेड किंगडम
ब्रिटनमध्ये विशेषतः लंडनमध्ये फिरणे खिसा हलका करणारेच आहे. राजा-राण्यांच्या या देशात परिवहनही महाग आहे. तेथील हॉटेल व जेवणही महागडे आहे.
जपान
हा अशा आशियाई देशांपैकी एक आहे जिथे पर्यटनासाठी आपल्याला मोठी रक्कम चुकवावी लागते. अनेक लोकांच्या बकेट लिस्टमध्ये जपानचे नाव असते; पण बजेट कमी असल्याने इथे फार थोडे लोक फिरण्यासाठी येतात. येथे राहण्यापासून ते ट्रान्सपोर्टेशनपर्यंत सर्व काही महागडे आहे.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियातील वन्यजीवन, ग्रेट बॅरियर रीफ व सिडनी ऑपेरा हॉऊससारखी ठिकाणे अत्यंत प्रसिद्ध आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियातही पर्यटन करणे महागडे ठरते.