वॉशिंग्टन : नुकताच 'वर्ल्ड लिव्हर डे' झाला. अमेरिकेत सध्या यकृताबाबतच्या समस्यांमध्येही मोठीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दर चारपैकी एका अमेरिकन नागरिकाला फॅटी लिव्हरची समस्या आहे. अमेरिकेतील 26 कोटींपेक्षाही अधिक प्रौढ लोकसंख्येपैकी नॉन अल्कोहोलिक सुमारे 6.4 कोटी तरुणांना फॅटी लिव्हरची समस्या आहे. मद्यसेवन करीत नसतानाही ही समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे आरोग्याला अपायकारक अशा जंकफूड याचे सेवन! या समस्येला 'नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज' (एनएएफएलडी) असे नाव देण्यात आले आहे.
या आजाराचा छडा रूटिन हेल्थ चेकअपवेळी लागत नाही. प्रारंभिक स्तरावर त्याची विशेष लक्षणेही दिसत नाहीत. मात्र, काही वर्षांनंतर पोटाचा उजवा भाग सुजलेला दिसू लागतो. हा प्रकार इतका धोकादायक आहे की यामुळे यकृत निकामी होऊन जीव जाण्याचाही धोका संभवतो. अमेरिकन हेल्थ असोसिएशनने याबाबतची माहिती दिली आहे.
अमेरिकेतील दहा कोटी तरुणांपैकी 40 टक्के अतिखाण्याने नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या विळख्यात सापडले आहेत. रिजन युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ डॉ. पॉल डुले यांनी सांगितले की यकृताची ही समस्या आता सर्वत्र दिसून येत आहे जी लाखोंच्या मृत्यूचे कारण बनू शकते. ज्यांना आधीपासूनच मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब अशा समस्या आहेत त्यांना या आजाराचा धोका अधिक असतो. हा आजार अनुवंशिक रूपानेही उद्भवू शकतो.