न्यूयॉर्क : जगभरात झोप ही मोठी समस्या होत आहे. आठपैकी एक व्यक्तीला झोपेबाबतची समस्या असते. रात्री चांगली झोप न मिळाल्यास दिवस खूपच कंटाळवाणा जातो आणि काम करण्याची इच्छाच मरून जाते. द स्लीप प्रिस्क्रिप्शन या पुस्तकाचे लेखक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. एरिक प्रॅथर यांच्या म्हणण्यानुसार, चांगली झोप माणसाला दयाळू आणि क्रिएटिव्ह बनवते. त्यासाठी चांगले पालक अथवा चांगल्या जीवनसाथीची मदत होते. प्रॅथर यांनी आपल्या पुस्तकात झोपेबाबत अनेक उपाय सांगितले आहेत. आपल्या समस्या घरातील व्यक्तीबरोबर केल्यानंतर मन हलके होऊन चांगली झोप लागण्यास मदत होते. आपण झोपत असलेल्या खोलीतील वातावरणही झोपेसाठी कारणीभूत ठरत असते.
एकाच ठिकाणी रोज रोज झोपल्याने बर्याचवेळा झोप येत नाही. झोपण्याची जागा जरी बदलू शकला नाही तरी झोपण्याची दिशा मात्र बदलू शकता. रात्रीच्या वेळी पौष्टिक आहार आणि हलका नाश्ता केल्यानंतर फिरायला जाणे महत्त्वाचे ठरते. एखादे गाणे जरी गुणगुणाल तर मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. बागेत वेळ घालवल्यानंतर मन प्रसन्न राहते. झोपेत असलेल्या खोलीचे तापमान योग्य राखून अन्य ठिकाणी लॅपटॉप आणि कॉम्प्युटर ठेवल्यास झोपेच्या खोलीतील वातावरण प्रसन्न राहते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या समस्या आपल्या मित्रांशी अथवा जवळव्या व्यक्तींशी शेअर केल्यास चांगली झोप लागते, असे प्रॅथर यांनी सांगितले.