Latest

चहरच्या तंदुरुस्तीचा संशयकल्लोळ

Shambhuraj Pachindre

दुबई : वृत्तसंस्था; आशिया चषकासाठी दुबईत दाखल झालेल्या भारतीय संघाला धक्क्यावर धक्के बसत असतानाच आशिया चषक स्पर्धेसाठी राखीव गोलंदाज म्हणून निवड झालेल्या दीपक चहरने दुखापतीतून माघार घेतल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते; परंतु 'बीसीसीआय'च्या सूत्रांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले.

आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास दोन दिवस राहिले आहेत आणि तरीही भारतीय संघामागे लागलेले विघ्न काही केल्या कमी होताना दिसत नाही. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल या दोन प्रमुख गोलंदाजांनी दुखापतीमुळे आधीच आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना संघासोबत दुबईत जाता आलेले नाही. आता दीपक चहरच्या माघारीचे वृत्त गुरुवारी दिवसभर प्रसिद्धीत होते.

पण, दीपक चहरला कोणतीही दुखापत झाली नसून, तो संघासोबतच असल्याचे 'बीसीसीआय'च्या सूत्रांनी स्पष्ट केले. कुलदीप सेन याची नेट गोलंदाज म्हणून निवड झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चहर संघासोबत दुबईत आहे आणि त्याने बुधवारी सराव सत्रातही सहभाग घेतला. आजही तो सराव सत्रात सहभागी होणार आहे. तो तंदुरुस्त आहे. कुलदीप नेट गोलंदाज म्हणून सहभागी झाला आहे, असे 'बीसीसीआय'च्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून व आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणार्‍या 25 वर्षीय कुलदीप सेनचा नेट बॉलर म्हणून संघात समावेश केला गेला आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत आशिया चषक स्पर्धा होणार आहे. श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारताच्या 15 सदस्यीय संघात भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग व आवेश खान हे तीन जलदगती गोलंदाज आहेत. चहरने 6 महिन्यांनंतर झिम्बाब्वे दौर्‍यातून पुनरागमन केले. आशिया चषक स्पर्धेत त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. कुलदीप सेनचे प्रशिक्षक अरिल अँथोनी यांनी कुलदीपच्या निवडीला दुजोरा दिला. कुलदीपचा भाऊ जगदीप सेन यानेही 'बीसीसीआय'चे निवड समितीप्रमुख चेतन शर्मा यांनी 22 ऑगस्ट रोजी कॉल केला असल्याचे सांगितले. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने 20 लाखांत कुलदीपला आपल्या ताफ्यात घेतले. त्याने 7 सामन्यांत 8 विकेटस् घेतल्या होत्या.

विराट कोहली-बाबर आझमची भेट

आशिया चषकासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यूएईमध्ये दाखल झाले आहेत. सरावासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहली आणि बाबर आझम यांची अचानक भेट झाली. यावेळी दोघांनी हस्तांदोलन केले.

आशिया चषकाचे 132 देशांमध्ये थेट प्रक्षेपण

दुबई : आशिया चषक स्पर्धेला जगात डिमांड आहे आणि जवळपास 132 देशांमध्ये या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याला खूप अधिक मागणी आहे. आशिया चषक स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचे सर्वाधिक राईटस् स्टार स्पोर्टस् नेटवर्कने खरेदी केले आहेत. त्यांनी अन्य टी.व्ही. चॅनेलला या राईटस्च्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाची परवानगी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT