kasturi

चटपटीत बटाटे

अनुराधा कोरवी

साहित्य :

एक किलो बटाटे (कमी पाण्यात उकडावेत. सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे करावेत.) साधारण आंबट दही, अर्धा कप भाजलेले तीळ, एक टीस्पून तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती :

भाजलेले तीळ आणि मिरच्यांचं वाटण करून घ्यावं. या वाटणात दही घालावं. हे मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवावं. मध्यम आचेवर एक नॉनस्टीक पॅन गरम करत ठेवावा. त्याला तेलाचा हात लावावा. त्यात हे वाटण घालावं. थोडा वेळ परतल्यावर त्यात मीठ घालावं. आता त्यात बटाटे घालावेत. बटाट्यांना वाटण नीट लागेपयर्र्ंत परतावं. आता आच वाढवावी. पाणी निघून जाईपर्यंत परतावं. स्टार्टर किंवा स्नॅक म्हणूनही हा पदार्थ खाता येईल.

SCROLL FOR NEXT