कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
गोकुळबद्दल कळवळा आहे, असे म्हणणार्यांकडून संघाची नाहक बदनामी का? असा सवाल गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. शौमिका महाडिक यांच्या आरोपांना उत्तर देताना पाटील यांनी गोकुळच्?या एक वर्षाच्?या कामकाजाबाबत दिशाभूल करू नका, असे आवाहनही केले.
पूर्वीच्याच पद्धतीने आजही निविदा प्रक्रिया राबविली जात असून त्?यामध्ये कोणताही बदल न करता पारदर्शीपणा ठेवला आहे. निर्णय घेण्?याचे स्वातंत्र्य संचालकांना आहे. यापूर्वी काटकसर करून दरवाढ देतो म्हणार्यांनी खरी लूट माजवली होती, असे सांगून इतर सर्व ठिकाणी दरवाढ केल्यानंतर कोल्हापुरात दरवाढ केल्याचे पत्रकात म्हंटले आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत 5 कोटी 60 लाख लिटर्स (13.43 टक्के) एवढी दूध विक्री वाढली आहे. एका दिवसात 20 लाख लिटर्सपेक्षा जास्?त दुधाची विक्री करून गुणवत्ता सिद्ध केली आहे. काटकसरीने व्यवहार करून वर्षभरात चांगली बचतही केली आहे. गोकुळची गुणवत्ता सिद्ध झाली आहे. दर्जेदार उत्पादने पुरविणे हे धोरण असल्याने दूध खरेदी किमतीमधील दरवाढ विचारात घेऊन दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढविणे आवश्यक होते. बाजारातील इतर स्पर्धकांच्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी होत्या, त्याचा परिणाम विक्रीवर झाला असल्?याचे पाटील यांनी मान्?य केले आहे. संघाच्या निर्णय प्रक्रियेत कोणाचाही हस्तक्षेप नाही. गोकुळच्?या कामकाजाचा आलेख चढत्?या दिशेने असल्याचे त्यांनी म्हटले आहे.