Latest

गर्लफ्रेंडसाठी आई-वडिलांना बांधून ठेवले; 14 लाख लुटले

दिनेश चोरगे

मेरठ;  वृत्तसंस्था :  नमन नावाच्या एका दिवट्याने गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी चक्क आपल्याच घरात डल्ला मारला. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. नमनला त्याच्या मित्रांनी या गैरकृत्यात साथ दिली. आई-वडिलांना बांधून ठेवले आणि रोख रकमेसह दागिने लुटले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईल कॉल, मेसेज व चॅट हिस्ट्री डिलिट केल्यावरही पोलिसांनी गुगल बॅकअपच्या मदतीने सर्व हिस्ट्री बाहेर काढली आणि या दिवट्याच्या मुसक्या आवळल्या.

चिंटू सैनी, शिवम सैनी, शिवम गिल या मित्रांना नमनने मोबाईल कॉल, मेसेंजर व व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून घरात पैसे कुठे ठेवलेले आहेत, याची माहिती दिली. ठरल्यानुसार मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास नमननेच दरवाजा उघडला आणि चोरट्या मित्रांना वेलकम केले. तिजोरीचे लोकेशन सांगितले. नंतर या मित्रांनी नमनच्या आई-वडिलांना बांधून ठेवले. 14 लाखांची रोकड व दागिने घेऊन पोबारा केला. सर्वांनी चेहर्‍यावर रुमाल गुंडाळलेले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT