नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान होत असून मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट मुकाबला होणार आहे. खर्गे यांचे पारडे जड मानले जात आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 देशभरातील 40 केंद्रांवर मतदान होईल. एकूण 9800 प्रदेश प्रतिनिधी मतदानांत भाग घेणार आहेत. खर्गे हे बंगळूर येथे तर शशी थरूर हे तिरूअनंतपूरम येथे मतदान करतील. 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकालांची घोषणा होईल.