कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आणि टोमॅटो एफएम आयोजित 'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स – 2022 ' प्रदर्शनाच्या स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात मोजकेच स्टॉल शिल्लक असून, बुकिंगसाठी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
बसंत-बहार रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये 20 ते 22 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. 'गगन टूर्स ' या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक 'अ हेवन हॉलीडेज' आहेत. पर्यटन हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय. अनेकजण दसरा-दिवाळीच्या सुट्टीमध्ये सहलीला जाण्याचा बेत आखतात. त्याचे प्लॅनिंग आतापासूनच केले जाते. ट्रिपचा प्लॅन करताना सुरुवात होते, ती स्थळ निवडीपासून मित्र-मैत्रिणींनी सोशल मीडियावर टाकलेले फोटो पाहून, पर्यटन संस्थांनी दाखविलेल्या पर्यटनाच्या जाहिराती, यू-ट्यूबवरील प्रवास आणि भटकंतीचे व्हिडीओ अशा अनेक माध्यमांतून स्थळ निवडीचा विचार केला जातो.
घरातील इतर सदस्यांच्या आवडी-निवडी, सवडीनुसार फिरायला कोठे, कधी आणि कसे जायचे याबाबतच्या बैठका सुरू होतात. मात्र, यामध्ये बराचसा वेळ आणि पैसाही खर्च होतो. एवढे होऊनही समाधान होईलच असे नाही. या सार्यांचा विचार करून पर्यटकांना योग्य मार्गदर्शनासाठीच 'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनातून पर्यटकांना देश-विदेशांतील सहलींबरोबरच पर्यटनाच्या माहितीचा खजिना खुला होणार आहे. ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा, धार्मिक ठिकाणे, नवदाम्पत्यांसाठी खास हनिमून पॅकेजिस, कृषी पर्यटन, अभ्यास सहलींचा प्रदर्शनात समावेश आहे. 25 हून अधिक स्थानिक पर्यटन संस्थांसह जगप्रसिद्ध विविध संस्था, नामवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार
आहेत.
रिया (कोल्हापूर) : 8805021253, सनी (कोल्हापूर) : 9922930180, प्रणव (कोल्?हापूर ) ः 9404077990, चंदन (पुणे) : 9881256084, बाळासाहेब (नाशिक) : 9765566411, अतुल (मुंबई) : 9820436956 , परितोष (सांगली) : 8805007283.