Latest

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ आणि झी मराठी आयोजित कलाकारांशी थेट संवाद

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेची कथा कोल्हापुरातील आहे. अधिपती (नायक), अक्षरा (नायिका) आणि भुवनेश्वरी (सासू) या तीन मध्यवर्ती पात्रांभोवती कथा फिरते. करोडपती पण अल्पशिक्षित अधिपतीच्या शाळेतच अक्षरा शिक्षिका आहे. सावत्र आई भुवनेश्वरी ही आपल्या भोळ्या भाबड्या मुलाला ताब्यात ठेवत त्याची संपत्ती लाटण्याचा प्रयत्न करत असते. अशातच अक्षरा आणि अधिपती यांच्या प्रेमाला पालवी फुटते याला भुवनेश्वरी अडथळा ठरते. हे त्रिकुट एकत्र आल्यावर काय होईल? शक्तिशाली विरुद्ध सशक्त, सुसंस्कृत विरुद्ध असंस्कृत अशा लढाईने भरलेल्या आणि अनागोंदीच्या काळात फुलणारी प्रेमकथा आहे.

कस्तुरी क्लब महिला महोत्सव

शनिवार, दि. 11 मार्च रोजी शुभंकरोती हॉल, मंगळवार पेठ येथे दुपारी 3 वाजता या कार्यक्रमात मालिकेतील अभिनेता ऋषीकेश शेलार आणि अभिनेत्री कविता लाड, शिवानी रांगोळे यांच्याशी गपशप करता येणार आहेत. विशाल सुतार यांचे झंकार एंटरटेनमेंट यांचा नवीन हिंदी, मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

कोल्हापुरात घडणार्‍या या मालिकेचे अस्सल मराठमोळ्या शैलीत हटके प्रमोशन या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले जाणार आहे. दिवसभरात हे कलाकार शहरात विविध ठिकाणी उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. झी मराठीच्या प्रेक्षकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या सोयीनुसार सेलिब्रिटींशी संवाद साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क : 880502 4242, 8329572628

कलाकारांचा थेट संवाद

मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सकाळी साडेदहा वाजता, तर केएमसी कॉलेजमध्ये दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांशी संवाद, 1 वाजता टोमॅटो एफ.एम.च्या माध्यमातून श्रोत्यांशी थेट संवाद. 4 वाजता रिलायन्स मॉलमध्ये उपस्थितांसोबत गुजगप्पा आणि सायंकाळी 5 वाजता डीवायपी मॉल येथे उपस्थित कोल्हापूरकरांशी मनमोकळ्या गप्पा करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT