कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी करुणा धनंजय मुंडे यांच्यासह 14 जणांनी अर्ज दाखल केले. एकूण 19 जणांनी अर्ज भरले असून, शुक्रवारी छाननी होणार आहे.
महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी गुरुवारी आणखी दोन अर्ज दाखल केले. भाजपचे सत्यजित कदम यांनीही आणखी एक अर्ज दाखल केला.वंचित बहुजन आघाडीचे शाहीद शहाजान शेख, काँग्रेसकडून सचिन चव्हाण यांनी दोन अर्ज दाखल केले. करुणा मुंडे यांच्यासह बाजीराव नाईक, संजय माघाडे, अरविंद कांबळे, भारत भोसले, मुस्ताक मुल्ला, सुभाष देसाई, अस्लम सय्यद, मनीषा कारंडे, राजेश कांबळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. दुपारी तीन वाजताही काही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर होते, त्यांना टोकन देण्यात आले. अहमदनगर येथून एक इच्छुक टोकन दिल्यानंतर कार्यालयात आला. त्याचा अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात आला.