दोनवडे, श्रीकांत पाटील : कुंभी-कासारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकताच आ. पी. एन. पाटील व आ. विनय कोरे यांनी 11 जागांचा प्रस्ताव चंद्रदीप नरके गटाकडे ठेवला आहे. आमदार सतेज पाटील यांनीही शाहू आघाडीच्या नेत्यांना कारखाना बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कारखाना बिनविरोध होणार की निवडणूक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व नेत्यांनी पुढाकार घेतल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.
तोडगा निघाला नसल्यास आमदार पी. एन. पाटील व आमदार विनय कोरे प्रत्यक्षपणे निवडणुकीत भाग घेऊन कार्यकर्त्यांच्या बरोबर प्रचारासाठी उभे राहणार आहेत.
सत्ताधारी नरके गट व विरोधी शाहू आघाडी यांची पॅनेल बांधणी झाली आहे. 30 जानेवारीपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. विरोधी शाहू आघाडीने एकजूट केली आहे. मागील निवडणुकीत शेवटच्या क्षणी फूट पडल्याने निवडणूक एकतर्फी झाली होती. मतभेद विसरून एकत्र निवडणूक लढण्याचे ठरले आहे. फूट होऊ नये म्हणून दुर्गमानवाड येथील विठ्ठलाई देवीला साकडे घालण्यात आले आहे.
कुंभी-कासारी बिनविरोधची सर्व जबाबदारी आ. पी. एन. पाटील व आ. विनय कोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कारखाना अडचणीत असल्याने तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर कुंभी बिनविरोध करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांनी मध्यस्थी सुरू केली आहे. यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतात हे अवघ्या काहीच दिवसांत समजेल.
सत्ताधारी नरके गट व विरोधी शाहू आघाडी यांची पॅनेल बांधणी झाली आहे. दि. 30 जानेवारीपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. विरोधी शाहू आघाडीने एकजूट केली आहे. मागील निवडणुकीत शेवटच्या क्षणी फूट पडल्याने निवडणूक एकतर्फी झाली होती. मतभेद विसरून एकत्र निवडणूक लढण्याचे ठरले आहे. फूट होऊ नये म्हणून दुर्गमानवाड येथील विठ्ठलाई देवीला साकडे घालण्यात आले आहे. पॅनल जाहीर होण्यापूर्वीच अनेकांनी प्रचार सु केला आहे.
एकीकडे बिनविरोधसाठी आ. पी. एन. पाटील व विनय कोरे यांची बोलणी सुरू आहे. दुसरीकडे सत्ताधारी नरके गट व विरोधी शाहू आघाडीने पॅनेल बांधणी केली आहे. आ. पाटील व आ. कोरे यांचा प्रस्ताव चंद्रदीप नरके गटाला मान्य होणार का? नरके गट काय भूमिका घेणार? तरच बिनविरोध शक्य होणार आहे.
शाहू आघाडी एकसंध राहणार का?
2015 च्या निवडणुकीत शाहू आघाडीने तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने निवडणूक एकतर्फी झाली. यावेळी तसे होणार का, ताकदीनिशी लढणार, हे आता काहीच दिवसांत पाहायला मिळणार आहे.