Latest

कसे असेल नव्या पिढीचे इंटरनेट?

Arun Patil

नवी दिल्ली : आता भारतात '5-जी' तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. ते नेमकं कसे असेल याची उत्सुकता देशातील नागरिकांना आहे. मोबाईल नेटवर्क आणि डाटा स्पीड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता 5-जी नेटवर्कचा लिलाव सुरू झाला आहे. या लिलावात अनेक मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. 5-जी नेटवर्क आल्यानंतर कॉल आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल, इंटरनेट स्पीड चांगलेच वाढेल हे उघडच आहे!

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 26 जुलैला 5-जी नेटवर्कसाठी लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. 5-जी स्पेक्ट्रम लिलावात चार स्थानिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यामध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीतील प्रमुख जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांसह गौतम अदानी यांच्या अदानी डाटा नेटवर्क्सचाही समावेश आहे. टेलिकॉम क्षेत्रात अदानी प्रथमच प्रवेश करीत आहेत.

5-जी मुळे फास्ट इंटरनेट स्पीडसोबतच दर्जेदार कॉल सुविधा आणि कनेक्टिव्हिटी मिळेल. कॉल ड्रॉपची समस्या दूर होईल. 5-जी साठी यूजर्सला किती खर्च करावा लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ते नक्कीच स्वस्त नसतील असे तज्ज्ञांचे मत आहे. 4-जी नेटवर्कवर यूजरला 100 एमबीपीएस स्पीड मिळतो, 5-जी नेटवर्कमध्ये 10 जीबीपीएसपर्यंत स्पीड मिळेल. जगातील अनेक देशांमध्ये 5-जी सर्व्हिस सुरू झालेली आहे. आता भारतातही ती लवकरच सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT