कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आपले करिअर आपल्याच हाती असते. मात्र, त्या करिअरची दिशा आणि यशाचा राजमार्ग मिळवण्यासाठी आवश्यकता असते ते योग्य मार्गदर्शनाची. हीच मानसिकता हेरून, दै. 'पुढारी' आणि जेएसपीएम युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा तज्ज्ञांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात जेएसपीएम युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. बी. बी. आहुजा, जेएसपीएम युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीचे डॉ. महेश बुरांडे तसेच जेएसपीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. संतोषराव बोर्डे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
करिअर निवडताना प्रभावी घटकगुणांवर आधारित गुणानुक्रमे शाखानिवड केली जाते. यासह काळानुरूप इतर ट्रेंडस्चा विचार मुलांकडून केला जातो. त्यानुसार बारावी करिअर निवडीबाबत मुलांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे योग्य ध्येय निश्चित करावे, यासाठी कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
लिबरल आर्टस्, फॉरेन्सिक सायन्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, अॅनिमेशन, ईआरपी आणि ई-मोबिलिटी यांसारख्या सर्वसामान्यांना अनभिज्ञ असणार्या नवनव्या करिअरक्षेत्रातून यशाचा राजमार्ग निवडण्याबाबत चर्चाही कार्यक्रमात होणार असून, यामधून या क्षेत्रात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या मनातील संभ—म तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे दूर करण्यात येणार आहे. यासह अन्य क्षेत्रांतील करिअरच्या संधीबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून विनामूल्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात 11 वी, 12 वी आणि पदवीधर विद्यार्थी आणि पालक यांनाही मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी गरजेची आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी पूर्वनोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 9834433274, 9404077990 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम)
ची 1998 ला उभारणी अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रात शिक्षणासाठी उत्कृष्टतेची केंद्रे निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. ही युनिव्हर्सिटी जेएसपीएम शैक्षणिक समूहाच्या वाघोली कॅम्पसमध्ये कार्यरत असून, त्याअंतर्गत 78 हून अधिक संस्थांचे समूह आहेत. प्री-स्कूल ते डॉक्टरेट रिसर्चपर्यंतचे दर्जेदार शिक्षण प्रदान केले जात असून अत्याधुनिक प्रयोगशाळा, उत्कृष्ट ग्रंथालय, वाहतूक, वसतिगृह आणि वैद्यकीय सुविधा, कौशल्य विकासासोबत विविध क्रीडाप्रकारांची सांगड येथील विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवते.