Latest

कराड जनता बँकेची ‘ईडी’कडून चौकशी

Arun Patil

कराड ; पुढारी वृत्तसेवा : कराड जनता सहकारी बँकेच्या कारभाराची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू आहे. केवळ चार कर्जदारांच्या मोठ्या कर्जाने बँकेवर दिवाळखोरी लादल्याची भावना असून त्या अनुषंगाने ईडीकडून त्या चार मोठ्या कर्ज व्यवहारांची चौकशी सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बँकेच्या मुख्य कार्यालयात ईडीचे अधिकारी मंगळवार दि. 2 रोजी दिवसभर ठाण मांडून होते. बँकेच्या कर्ज व्यवहारांची चौकशी केली. तीन दिवसांपूर्वी अवसायानिक मनोहर माळी यांच्याकडेही ईडीने कर्ज वसुलीच्या सद्यस्थितीचा अहवाल मागवला आहे. तत्पूर्वी, ईडी कार्यालयात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सूर्यवंशी यांच्याकडेही तब्बल दहा तासांहून अधिक काळ चौकशी झाली आहे.

कराड जनता बँकेच्या बेहिशेबी कर्ज वाटपासह त्याची मजुंरीही ईडीच्या कचाट्यात आहे. त्या चार कर्जदारांच्या थकीत कर्जाची रक्कम 500 कोटींच्या आसपास आहे. बँकेने ती रक्कमच वसूल केलेली नाही. चारपैकी दोघांना विनातारण कर्जे दिल्याने त्या विरोधात चौकशी सुरू आहे. त्यामुळे कर्ज मर्यादांच्या पालनाच्या नियमांना डावलून कर्ज वाटल्याने ईडीकडे तक्रार दाखल झाली.

याप्रकरणी सहकार खात्यासह कराडच्या न्यायालयात बँकेचे सभासद आर. जी. पाटील यांनी 310 कोटींच्या अपहाराची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अपहाराचा गुन्हा दाखल होवून त्याची पोलिस चौकशी सुरू आहे. त्याच काळात बँकेची दिवाळाखोरी जाहीर झाल्याने सर्व व्यवहार चौकशीच्या रडारवर आले होते. ईडीकडेही त्या व्यवहाराच्या चौकशीची तक्रार दाखल झाली.

मोठ्या कर्जांची बोगस कागदपत्रे, नियमबाह्य आणि विनातारण कर्ज झाले. त्यामुळे अवैध व्यवहार अधोरेखीत झाले. त्यात गैरप्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने ईडीने चौकशी सुरू केली आहे. कराड जनता बँकेच्या चारच कर्जदारांच्या थकीत कर्जे किती, वसुली किती झाली, तारण काय आहे, या सगळ्याची चौकशी होत आहे. उद्योजकांना विनातारण तर कारखानदारांनाही मोठी कर्जे दिली आहेत, या सगळ्याची चौकशी सुरू आहे. त्यासाठी ईडी कार्यलायकडून काही अधिकारी मंगळवारी दिवसभर शहरात दाखल झाले होते. त्यांची चौकशी सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT