मुंबई ; पुढारी ऑनलाईन : कंगना राणावत आणि वाद हे एक समीकरणच बनलेले आहे. भन्नाट वक्तव्ये करणारी कंगना आपल्या अशा बोलण्यामुळे अनेक वेळा अडचणीत आलेली आहे. सध्या ती आपल्या 'धाकड' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेली आहे. यानिमित्ताने तिने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लग्नाचा विषयही काढला. तिने सांगितले, माझे लग्न होत नाहीये. याचे कारण म्हणजे मी भांडखोर असून सतत सर्वांशी भांडत असते, मारहाण करते, अशी पसरवलेली अफवा! त्यामुळे मला लग्नासाठी मुलगा मिळेना झाला आहे. या अफवांमुळे तिच्याबद्दल एक छाप निर्माण झाली आहे जी तिला खास व्यक्ती शोधण्यापासून रोखत आहे.
अर्थात तिने हे सर्व मुलाखतीवेळी गमतीने सांगितले. त्यावेळी चित्रपटातील तिचा सहकलाकार अर्जुन रामपालने तिचे चांगले गुण सांगून तिच्यासाठी मी मुलगा शोधणार असल्याचे सांगितले! अर्जुनने सांगितले की, कंगनाबाबत बरेच गैरसमज आहेत. ती एक गुणी अभिनेत्री आहेच; पण वास्तवात एक अतिशय गोड, प्रेमळ आणि देवाबाबत नितांत श्रद्धा असलेली मुलगी आहे. पूजापाठ, योगा करणारी ती एक साधीसुधी मुलगी आहे! कंगनाचा हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये दिव्या दत्ताही प्रमुख भूमिकेत आहे.
या मुलाखती दरम्यान ती म्हणाली की, रीअल लाइफमध्ये मी कुणाला मारेल? असं नाही. मी लग्न करू शकत नाही कारण तुमच्यासारखे लोक या अफवा पसरवत आहेत'. काही दिवसांपूर्वी कंगनाने आपल्या फ्यूचरबाबत वक्तव्य केले होते. कंगना राणावत एका माध्यमाशी बाेलताना म्हणाली की, पुढील ५ वर्षात तिला स्वत:ला आईच्या रूपात बघायचं आहे. 'मला लग्न करायचं आहे आणि मुलंही हवी आहेत. मला स्वत:ला पाच वर्षात आई आणि पत्नीच्या रूपात बघायचं आहे'. असे ती म्हणाली.
या मुलाखतीदरम्यान 'धाकड' सिनेमातील अभिनेता अर्जुन रामपाल हा देखील उपस्थित होता. रामपालने कंगनाचा चांगुलपणा वाहवा केलीच, पण अशा अफवा पसरवू नका असेही मजेशीरपणे तो म्हणाला. 'कंगनाबद्दल मी एवढेच सांगेन की ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. ती जे काही करते, ते तिच्या भूमिकेसाठी करते, पण खऱ्या आयुष्यात ती तशी नाही. कंगना खऱ्या आयुष्यात खूप गोड, प्रेमळ आहे.'
कंगनाचा 'धाकड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. कंगना राणावत आणि अर्जुन रामपाल यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री ऍक्शन करतानाही दिसणार आहे.