ओठ हे आपल्या चेहर्यावरील महत्त्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या आकाराच्या ओठांमुळे चेहर्याला वेगळा लूक मिळतो. ओठांची निगा राखणे, सौंदर्य राखणे महत्त्वाचे ठरते. व्यक्तिमत्त्व विकास आणि चेहर्याच्या काळजीमध्ये ओठांकडे लक्ष द्यायला हवे. आज उठावदार सौंदर्यासाठी प्रत्येक जण लिपस्टिकचा वापर करताना दिसतात. ओठांना सुंदर बनवायचे असेल, तर खालील टिप्सचा अवलंब करायला हवा.
* ओठांच्या सौंदर्यासाठी रोज 5 ते 6 ग्लास पाणी प्यायला हवे. पाण्यामुळे फक्त शरीराला लागणारी पाण्याची गरज पूर्ण होते. शिवाय, ओठांची नमी कायम राहते.
* बदलत्या हवामानाचाही आपल्या त्वचेवर आणि सौंदर्यावर परिणाम होतो. त्याचा जास्तीत जास्त परिणाम ओठांवर पडतो. म्हणून नेहमी चांगल्या कंपनीचे लिप बाम दिवसातून दोन-तीन वेळा लावायला पाहिजे.
* बर्याच जणींना ओठांना चावायची सवय असते, ती बदलायला पाहिजे.
* दीर्घकाळापर्यंत लिपस्टिकची चमक कायम ठेवण्यासाठी लिपस्टिक लावल्यानंतर टिशू पेपरने एक्स्ट्रा लिपसिनटक काढून घ्यावे. यामुळे लिपस्टिकची चमक पूर्ण दिवसभर कायम राहते.
* डार्क कलरचे लिपस्टिक लिप्सला स्मॉल लूक देतात. तुमच्या ओठांचा आकार लहान असेल आणि त्याला मोठा लूक द्यायचा असेल, तर नॅचरल कलरचे लिपस्टिक वापरायला पाहिजे.
* ओठ जाड असतील, तर कन्सीलर आणि फाऊंडेशनच्या मदतीने लिप्सला पातळ शेप देऊ शकता. लिप लायनरने आऊट लाईन ड्रॉ करावी आणि डार्क कलरचे लिपस्टिक त्यात भरायला पाहिजे.
* लिप्सला हॉट लूक द्यायचा असेल, तर स्ट्रॉबेरी आणि चेरी शेडस्चा लिपस्टिकसुद्धा लावू शकता.