पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या दमदार कामगिरी करत आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजयी मिळवला आहे. ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार सध्या वेस्ट इंडिजमधील त्रिनिदादमध्ये दाखल झाले आहेत.
मंगळवारी सायंकाळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने हॉटेलच्या खोलीतून इंस्टाग्राम लाईव्हद्वारे सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार या संघातील सहकाऱ्यांना थेट व्हिडिओ कॉल केला. या खेळाडूंमध्ये मजेशीर गप्पा सुरू असतानाच लाईव्ह व्हिडिओदरम्यान काही क्षणांसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची एण्ट्री झाल्याने माहीच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला.
पंत त्याच्या मजेदार विनोदांसाठी ओळखला जातो. मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर. तो नेहमीच काही ना काही करत राहतो. यावेळी त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्याशी थेट चॅट केले.
मंगळवारी ऋषभ पंत हा इंस्टाग्रामवरून सूर्यकुमार आणि रोहितसोबत गप्पा मारत असताना महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी हीदेखील त्यांना जॉइन झाली. आणि तिने सर्वांना हाय-हॅलो केले. यादरम्यान ऋषभ पंतनेही नमस्कार केला व साक्षीला भाईकडे कॅमेरा फिरव, अशी विनंती पंतने केली. पंत आणि रोहितला फक्त हाय-हॅलो करत धोनीने लगेच पत्नी साक्षीकडून फोन काढून घेतला आणि कॅमेरा बंद केला.
एमएस धोनीचा हा दोन-तीन सेकंदांचा विडीओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर त्याने धुमाकूळ घातला. एमएस धोनी ट्विटरवर नंबर-१ चा ट्रेंड बनला आहे. हा विडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या व अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत.
आक्रमक फलंदाजी आणि कर्णधार म्हणून केलेल्या अनेक विश्वविक्रमांमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रिय असलेला महेंद्रसिंह धोनी हा सोशल मीडियापासून दूर राहतो. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी प्रतीक्षा करावी लागते. क्रिकेटमधून निवृत्तीच्या इतक्या वर्षानंतरही एमएस धोनी चाहत्यांचा लाडका आहे. आणि अशा प्रकारे तो काही क्षणांसाठी एका व्हिडिओमध्ये दिसला, तेव्हा तो अशा प्रकारे टॉप ट्रेंड झाला आहे.