Latest

उर्फी जावेद हिचा गुगलवर सर्वाधिक सर्च!

Arun Patil

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आशियात गुगलवर सर्वाधित सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी जाहीर झाली आणि या यादीत उर्फी जावेदने आपले स्थान निर्माण केले आहे. 'बिग बॉस ओटीटी'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या उर्फी जावेदने भलतेसलते पोशाख परिधान करून आपली प्रसिद्धी आणखी वाढवली.

'मोस्ट सर्च्ड एशियन्स ऑफ गुगल 2022' मध्ये उर्फीने 57 वे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे तिने केवळ गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या तर विशेष म्हणजे तिने कंगना रणौत आणि कियारा अडवाणी यांनाही याबाबतीत मागे टाकले आहे. चीनच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने 2022 ची आशिया खंडातील सर्वाधिक सर्च झालेल्या लोकांची ही यादी तयार केली आहे.

आशियात गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदनं वरचं स्थान पटकावलं आहे. सोशल मीडियावर आपल्या फॅशन आणि आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी आता बरीच प्रसिद्ध झाली आहे. बिग बॉस ओटीटीनंतर उर्फीला सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. उर्फी २०१६ पासून टीव्हीसृष्टीत काम करत आहे.

'बिग बॉस 15'ची विजेती तेजस्वी प्रकाशही उर्फीच्या मागे पडली आहे. या यादीत तेजस्वीचे नाव 81 व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर अनन्या पांडेचे नाव 98 व्या क्रमांकावर आले आहे. जान्हवी कपूर, शिल्पा शेट्टी, रकुल प्रीत सिंग, क्रिती सेनॉन, दिशा पटानीसह अनेक अभिनेत्रींना उर्फीने मागेल टाकले आहे.

गुगलवर टॉप 10 सर्च झालेल्या आशियाई लोकांमध्ये बीटीएस वी, जंगकूक, सिद्धू मूसेवाला, जिमिन, लता मंगेशकर, लीसा, कतरिना कैफ, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली यांच्या नावांचा समावेश आहे.

'बिग बॉस 15'ची विजेती तेजस्वी प्रकाशही उर्फीच्या मागे पडली आहे. या यादीत तेजस्वीचे नाव 81 व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर अनन्या पांडेचे नाव 98 व्या क्रमांकावर आले आहे. जान्हवी कपूर, शिल्पा शेट्टी, रकुल प्रीत सिंग, क्रिती सेनॉन, दिशा पटानीसह अनेक अभिनेत्रींना उर्फीने मागेल टाकले आहे.

उर्फी जावेदनं २०१६ मध्ये 'बड़े भइया की दुल्हनिया'मध्ये अवनी पंत ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 'चंद्र नंदिनी' या मालिकेतही दिसली होती.

उर्फीबद्दल सांगायचे तर, ती गेल्या वर्षी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी झाली होती. या शोमधूनच तिला प्रसिद्धी मिळाली. उर्फी नेहमीच तिच्या फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. 'बिग बॉस' व्यतिरिक्त उर्फी 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'बडे भैया की दुल्हनिया', 'मेरी दुर्गा' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT