Latest

इंजेक्शनच्या एका डोसने एचआयव्ही- एड्स होणार बरा, औषध विकसित

अमृता चौगुले

जेरुसलेम : पुढारी वृत्तसंस्था :  कॅन्सरनंतर वैज्ञानिकांनी आता एचआयव्ही एड्सवरही उपचार शोधून काढला आहे. इस्त्रायलमधील तेल अवीव विद्यापीठातील संशोधकांनी एक असे औषध विकसित केले आहे की, एकाच इंजेक्शनमध्ये शरीरातून एचआयव्ही विषाणू पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.

एड्सवर आतापर्यंत कोणताही रामबाण इलाज नव्हता. 'जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी'च्या मदतीने वैज्ञानिकांनी ही लस बनविली आहे. उंदरांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. 'जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी'च्या मदतीने विषाणू, जीवाणू तसेच मानवी पेशींमध्ये जनुकीय बदल घडवून आणले जाऊ शकतात, हे येथे उल्लेखनीय! पुढील काही वर्षांत कॅन्सर आणि एडस्वर कायमस्वरूपी उपचार शक्य होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT