Latest

मुंबई : आयआयटी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये तब्बल १२०० जणांना मिळाल्या नोकर्‍या, नामांकित कंपन्यांकडून ऑफर्स

Arun Patil

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आयआयटी मुंबईत सुरू असलेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहाव्या दिवसापर्यंत 1,201 आयआयटीयन्सना नोकर्‍या मिळाल्या आहेत. आतापर्यंत सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कंपनीकडून 2. 74 लाख अमेरिकन डॉलरची ऑफर मिळाली आहे. उबेर, रॅक्युटेन, क्वालकॉम, सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूट, इंटेल कॉर्पोरेशन आदी नामांकित कंपन्यांकडूनही मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळाल्या आहेत.

आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटला 1 डिसेंबरपासून सुरुवात झाली. 240 कंपन्यांनी आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली आहे. सर्वात मोठे पॅकेज उबेर कंपनीने 2. 74 लाख अमेरिकन डॉलर इतके आहे. रॅक्युटेन कंपनीने जगभरातील आपल्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक 26 ऑफर्स दिल्या आहेत.

रॅक्युटेनकडून विद्यार्थ्यांना वार्षिक 1.21 लाख अमेरिकन डॉलर्स पॅकेज दिले आहे. या शिवाय क्वालक्म कंपनीकडून विद्यार्थ्यांना आतपर्यंत 40 ऑफर्स मिळाल्याची माहिती प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे. याबरोबर गुगल, मायक्रोसॉफ्ट, क्वालकॉम, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, एअरबस,बेन अ‍ॅण्ड कंपनी यांच्याकडून विद्यार्थ्यांना चांगल्या देशांतर्गत ऑफर्स मिळाल्या आहेत.

यंदाच्या प्लेसमेंट्स पर्वाच्या शेवटी सहभागी कंपन्यांमध्ये मागील वर्षीपेक्षा 25 टक्क्यांची वाढ दिसून येण्याची अपेक्षा आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून व्यक्त होत आहे. यंदा विद्यार्थ्यांना मुलाखतपूर्व प्रस्ताव मिळण्याचे प्रमाणही काहीसे वाढले आहे. सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंटेल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना सर्वाधिक ऑफर्स मिळाल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली आहे.

ऑफरमध्ये वाढ

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी नव्या ऑफर यंदा आणल्या होत्या. यंदा प्री प्लेसमेंट ऑफर्समध्येही जास्त पॅकेजमध्ये देण्यात आली. ऑफर्स मान्य करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त होती अशी माहिती आयआयटी प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT