मुंबई : पुढारी वृत्तसेवा : 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असे नाव धारण करू पाहणार्या बंडखोर आमदारांच्या गटाने हा निर्णय तूर्त मागे घेतला आहे. शिवसेनेचे म्हणणे बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरू नका, असे असेल तर आम्ही वापरणार नाही. मात्र, आमच्याकडे एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार असल्याने आमचा गट हाच शिवसेना आमदारांचा गट आहे, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.
दीपक केसरकर यांची शिंदे गटाच्या आमदारांनी प्रवक्ते म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनी पहिल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत शिंदे गट हाच शिवसेना आमदारांचा अधिकृत गट असल्याचा दावा केला. आमच्या गटाचे नाव अजून ठरलेले नाही. बाळासाहेबांचा विचार मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असे नाव ठेवू, असा विचार पुढे आला होता. आम्हीही शिवसेनेत आहोत. पण, शिवसेनेला आक्षेप असेल तर त्याचा विचार करू, आम्ही काय शिवसेना संघटना तोडायला निघालेलो नाही, असे केसरकर म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मते मागायची तर आपल्या बापाच्या नावावर मागा, असे सुनावले होते. त्याबद्दल बोलताना केसरकर म्हणाले, आम्ही आता कोणाच्या नावावर मते मागितलेली नाहीत. निवडणुका अजून अडीच वर्षे पुढे आहेत. जर शिवसेनेच्या नावावरच मते मागितली असती तर शिवसेनेचे सर्वजण निवडून आले असते. मतदारसंघात त्या उमेदवाराचेही काहीतरी 'गुड विल' असते. आम्हाला फक्त आमची स्वतंत्र गट म्हणून मान्यता हवी आहे. आम्हाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्याएवढे संख्याबळ आमच्याकडे आहे. मुळात आम्हीच मूळ सेना गट आहोत, असा दावा केसरकर यांनी केला.
आमचे सर्वाधिकार शिंदेंना आमच्या गटाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. आम्हाला काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार नको ही आमची भूमिका आहे. ही भूमिका आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्याने केली होती. पण त्यांनी निर्णय न घेतल्याने ही परिस्थिती आली आहे. या परिस्थितीत कोणासोबत जायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. पण आम्ही काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. आम्ही स्वतंत्र बसू, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी हिंसाचार थांबवावा जेव्हा आम्ही गुवाहाटी येथे आलो तेव्हापासून महाराष्ट्रात वेगळे चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात आमची कार्यालये फोडली जात आहेत. घरावर हल्ले होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल, तेव्हा आम्ही मुंबईत येऊ. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आलेल्या आमदारांपैकी कोणीही पक्ष सोडलेला नाही. लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले जात आहे हे चुकीचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांनी राज्यातील दंगे थांबवावेत आणि आपले कर्तव्य पार पाडावे, अशी विनंती केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना केली.
उद्धव ठाकरेंनी नाराजी ऐकली नाही
दीपक केसरकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवले होते की, आपण भाजपसोबत एकत्र लढलो आहोत तर त्यांच्यासोबतच राहू. काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत राहून आपल्या पक्षाची अधोगती होत आहे. अनेक जणांनी ही गोष्ट त्यांना सांगितली होती. परंतु, तरी देखील त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी आमची भावना समजून घ्यावी, असे आवाहन केसरकर यांनी केले. घटनात्मक तरतुदीनुसार दोन तृतीयांश सदस्य आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही 'फ्लोअर टेस्ट'ला केव्हाही तयार आहोत. एकनाथ शिंदे हेच शिवसेना गटनेते रहातील, असे त्यांनी सांगितले. करू, आम्ही काय शिवसेना संघटना तोडायला निघालेलो नाही, असे केसरकर म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मते मागायची तर आपल्या बापाच्या नावावर मागा, असे सुनावले होते. त्याबद्दल बोलताना केसरकर म्हणाले, आम्ही आता कोणाच्या नावावर मते मागितलेली नाहीत. निवडणुका अजून अडीच वर्षे पुढे आहेत. जर शिवसेनेच्या नावावरच मते मागितली असती तर शिवसेनेचे सर्वजण निवडून आले असते. मतदारसंघात त्या उमेदवाराचेही काहीतरी 'गुड विल' असते. आम्हाला फक्त आमची स्वतंत्र गट म्हणून मान्यता हवी आहे. आम्हाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्याएवढे संख्याबळ आमच्याकडे आहे. मुळात आम्हीच मूळ सेना गट आहोत, असा दावा केसरकर यांनी केला.
अद्याप गटाचे नाव ठरले नाही ः एकनाथ शिंदे
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत. कालही शिवसेनेत आहोत, आजही आहोत आणि उद्याही राहू. त्यामुळे आम्ही कोणताही स्वतंत्र गट केलेला नाही, असे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. माझ्यासोबत जे काही आमदार आले आहेत, ते तीन-चार लाख लोकांतून निवडून येतात. त्यांना त्यांचे काय बरे, काय वाईट ते कळते. त्यांना फक्त शिवसैनिकांनी निवडून दिलेले नाही. तर लोकांनीही मते दिली आहेत. त्या जनतेसाठी निर्णय घेण्याचा अधिकार आमदारांना आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन जे आमदार येथे आले आहेत, त्यांची संख्या अधिक आहे. आमचा दोन तृतीयांश संख्येचा गट तयार झालेला आहे. आमदारांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दिले आहे. व्हिडीओ जारी करत भूमिका मांडली आहे. त्यामुळे सर्वजण आपल्या मर्जीने येथे आलेले आहेत. त्यामुळे आमचे काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आमदारांच्या घरावर व कार्यालयावर जे हल्ले होत आहेत त्यावरही शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. आमदार असतील की सामान्य नागरिक असतील, त्यांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असते. ही जबाबदारी सरकारने योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले.
शिवसेना तोडायला निघालेलो
नाही ः प्रवक्ते केसरकर
शिंदे यांना बंडखोर
गटाचे सर्वाधिकार
परिस्थिती बदलल्यावर
महाराष्ट्रात परतणार