कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : एकदा तोंड भाजले की ताकसुद्धा फुंकून प्यावे लागते. आता तेच करावे लागेल, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत सांगितले. राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांना संताप येणे स्वाभाविकच आहे. म्हणून महाविकास आघाडीत बिघाडी होईल असे काहीच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, राज्यसभा निवडणुकीबाबत आता बोलून काय उपयोग. छोटे पक्ष आणि अपक्षांची अपेक्षित मते मिळाली नाहीत. महाविकास आघाडीची 162 मते पडली. म्हणजे सरकारचे बहुमत आहेच.
विधान परिषद निवडणुकीबाबत मुश्रीफ म्हणाले, तोंड भाजले की आपण ताकही फुंकून पितो, त्याच पद्धतीने आता ताक फुंकून प्यावे लागेल. या निवडणुकीबाबत आघाडीतील पक्षांच्या बैठका होतील, चर्चा होईल. कोट्यातील मते देणार्यांबरोबर चर्चा होईल.