Latest

आता जीन्स पँटमध्येही एअरबॅग्ज!

Arun Patil

लंडन : मोटारीमध्ये अपघातावेळी संरक्षण व्हावे म्हणून एअरबॅग्जची सोय असते. त्यासाठीच सीट बेल्ट घालून बसावे लागते. जर दुर्दैवाने अपघात घडलाच तर या एअरबॅग्ज उघडून त्यामुळे आतील प्रवाशांचे संरक्षण होते. आता अशा एअरबॅग्ज चक्क जीन्स पँटेतही वापरण्यात येऊ लागल्या आहेत.

जीन्स पँट या सर्वप्रथम अमेरिकेत तयार करण्यात आल्या होत्या. सन 1873 मध्ये अमेरिकन टेलर जेकब डेव्हीस आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील कपड्यांचे व्यापारी लिवाए स्ट्रॉस यांनी मिळून अशा पँटस् प्रथम बनवल्या. अमेरिकेतील कामगारांसाठी त्यांनी या 'रफ-टफ' पँटस् बनवल्या होत्या. त्या काळात कामगार आपल्या पँटेत विविध अवजारे ठेवत असत व त्यामुळे त्यांच्या पँट लवकर खराब होत. ते लक्षात घेऊन 'लेवीज'चे माल लिवाए यांनी एक मजबूत कापड विकसित केले. सन 1934 मध्ये महिलांसाठीही जीन्स पँट बनवल्या जाऊ लागल्या. त्यानंतरच्या काळात जीन्स पँटेचे अनेक प्रकार जगभरात समोर आले.

आता तर जीन्स पँटेत चक्क एअरबॅग्जचीही सोय करण्यात आली आहे. स्वीडिश मोटार कंपनीने पहिली एअरबॅग जीन्स पँट विकसित केली आहे. दुर्घटना घडल्यास कारमधील एअरबॅग जशी काम करते तसेच ही जीन्सही कमरेखालील भागाची सुरक्षा करेल असा कंपनीचा दावा आहे. या जीन्सला मंगळवारी अमेरिकी बाजारपेठेत लाँच केले जाईल. सुमारे 41 हजार रुपये तिची किंमत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT