Latest

आगामी निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवणार : आ. शिवेंद्रराजे

Arun Patil

मेढा ; पुढारी वृत्तसेवा : यापुढे येणार्‍या प्रत्येक निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. करहर ता.जावली येथे भाजपाच्या वतीने आयोजित मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, करहर विभागातील पदाधिकारी, आशा सेविका आदी उपस्थित होते.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, येणार्‍या सर्वच निवडणूका भाजपाच्या कमळ चिन्हावर लढवल्या जातील. त्या दृष्टीने भाजपा पदाधिकार्‍यांनी कामाला लागावे. भाजपाची ध्येय, धोरणे प्रत्येक बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहोचवावीत.

आपला देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात असून दि. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासाठी भाजपा पदाधिकार्‍यांनी नियोजन करावे. कुठेही तिरंगा कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. घरोघरी तिरंगा अभियानात सर्वांनीच सहभाग नोंदवावा. शाळा, सार्वजनिक ठिकाणे, घरोघरी जाऊन अभियान राबविण्यासाठी प्रबोधन करावे, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात देशातील विविध भागात सामान्य लोकांनी राबवलेले मधूमक्षिका पालनासारखे विविध कार्यक्रम सांगितले. पदाधिकार्‍यांनी यासाठी कसलीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

आशा सेविकांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक सहकार्य असून आता सरकार आल्यामुळे मानधन वाढीसाठी ताकतीने प्रयत्न करणार, असे आश्‍वासन आशा स्वयंसेविकांच्या शिष्टमंडळास त्यांनी दिले.

श्रीहरी गोळे यांनी प्रास्तविक केले. माजी उपसभापती रविंद्र परामणे यांनी आभार मानले. यावेळी प्रमोद शिंदे, किरण भिलारे, प्रदिप बेलोशे, अविनाश पवार, दिपक गावडे, भाईजी गावडे, संजय बिरामणे, राजेंद्र गोळे, गोरख महाडिक, देवेंद्र राजपुरे, मोनिका परामणे, सौ. निलिमा पवार, सौ. पौर्णिमा गोळे, मंगल पांगारे, अरूणा शिर्के, वर्षा भिसे, कल्पना इंदलकर, मोनाली नवसरे, वैशाली तरडे, मिनाक्षी नवसरे, राणी परामणे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT