सायली कांबळे, जो राजन आणि अवधूत गुप्ते  
Latest

अवधूत गुप्तेसोबत इंडियन आयडल फायनलिस्ट सायली कांबळे हिचे नवे गाणे (Video)

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अवधूत गुप्तेसोबत इंडियन आयडल फायनलिस्ट सायली कांबळेचे नवे गाणे येणार आहे. इंडियन आयडलची फायनलिस्ट सायली कांबळे हिचे सिनेसृष्टीत पदार्पण होणार आहे. इंडियन आयडल गाजवल्यानंतर सायलीला पहिला चित्रपट मिळाला आहे. जो राजन यांच्या कोल्हापूर डायरीज चित्रपटात तिला संधी मिळतेय.

अधिक वाचा : 

तिने इंडियन आयडलच्या बाराव्या पर्वाचे व्यासपीठ गाजवले. आपल्या सुरेल स्वरांनी करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवणारी गायिका सायलीच्या स्वप्नवत प्रवासाला सुरूवात झालीय. सायलीचे इंडियन आयडल संपताना सिनेसृष्टीत पदार्पण करायचे स्वप्न पूर्ण झाले. फिल्ममेकर जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरीज चित्रपट येत आहे. या चित्रपटासाठी सायलीने गाणे गायले आहे.

अधिक वाचा : 

सायली कांबळे, जो राजन आणि अवधूत गुप्ते

माझं स्वप्न पूर्ण झालंय : सायली 

सायली म्हणते, मला विश्वासच बसत नाही आहे, की माझं स्वप्न पूर्ण झालंय. इंडियन आयडलमध्ये जाण्याचं कारणचं होतं. लोकांनी मला ओळखावं आणि माझं संगीत क्षेत्रात करीयर सुरू व्हावं. इंडियन आयडलचा ग्रँड फिनाले झाल्या झाल्या हातात काम असणं, हे भाग्याचं आहे.

लहानपणापासून अवधूत गुप्तेंची मी चाहती आहे. आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळतेय. चित्रपटाचे दिग्दर्शक जो राजन यांनी मला ही संधी दिली. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे.

जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरीजच्या या गाण्याला अवधूत गुप्तेंनी संगीत दिलंय. स्वप्नील बांदोडकर आणि सायली कांबळे यांनी हे रामँटिक गाणं गायलंय.

जे लवकरच गायत्री दातार आणि भूषण पाटील यांच्यावर चित्रीत होणार आहे.

जो राजन म्हणाले, "सायलीच्या गळ्यात जादू आहे. तिचा इंडियन आयडलचा संगीत प्रवास मी गेले कित्येक महिने पाहिलाय. त्यामुळेच मला तिचा अभिमान आहे. या महाराष्ट्राच्या लाडक्या मुलीला मराठी फिल्मसाठी ब्रेक देताना मला खूप आनंद होतोय."

अवधूत गुप्ते म्हणतात, आमचे दिग्दर्शक जो राजन यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनीच मला सायलीचे नाव या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे. ते ती दरवेळी सिध्द करते.

सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या जगाला मिळालीय, असं मला वाटतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT