मुंबई, वृत्तसंस्था : जग मंदीशी झुंजत असताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होताना दिसत आहे. या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 3.7 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
रिझर्व्ह बँकेने आपल्या बुलेटिनमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. त्यात हे नमूद करण्यात आले आहे. बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, सध्याच्या किमती आणि विनिमय दरांनुसार भारताची अर्थव्यवस्था 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान बळकट करेल. या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 3.7 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ती जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, भारत 2025 मध्ये चौथ्या स्थानावर आणि 2027 मध्ये 5.4 ट्रिलियन अर्थव्यवस्था म्हणून तिसर्या स्थानावर जाईल. चलनवाढीच्या आघाडीवर, रिझर्व्ह बँकेने किमती आणखी खाली आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. चालू वर्षात चलनवाढ 2-6 टक्के या सहनशीलतेच्या पातळीवरच ठेवण्याचे लक्ष्य आहे.
ताज्या तपशिलातून मिळणारे संकेत महत्त्वाचे आहेत. चलनविषयक धोरणाचा पहिला टप्पा पार केला जात आहे, चलनवाढ सहनशीलतेच्या पातळीवर आणली जात आहे. 2023 मधील उद्दिष्ट त्यात चलनवाढ आहे त्याच पातळीवर नियंत्रित ठेवण्याचेे आहे. तरच ते 2024 पर्यंतच्या लक्ष्याशी मिळतेजुळते राहील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.