अप्लास्टिक अॅनिमिया या रोगावर उपचार करताना रक्ताच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यासाठी एचबी, प्लेटकाऊंट, डब्ल्यूबीसी, इएसआर यांचा मागोवा घेत रक्तवर्धन चिकित्सा करणे गरजेचे ठरते. रुग्णाला अरुची हे लक्षण असल्यास जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर आम्लक्यादिचूर्ण आणि भोजनोत्तर आम्लपित्तवटी, पंचकोलासव किंवा पिप्पलादि काढ्याचा वापर करावा.
भूक कमी असल्यास सकाळी नाष्ट्यानंतर 8 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादिवटी, भोजनोत्तर कुमारीआसव, आम्लपित्तवटी अशी योजना रुग्णाचे शारीरिक वजन कमी असल्यास भोजनोत्तर अश्वगंधारिष्ट, रात्री झोपण्यापूर्वी आस्कंदचूर्ण. रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीनुसार; मुळातून पांडू विकार जावा म्हणून च्यवनप्राश, अश्वगंधापाक, धात्रीरसायन, शतावरीकल्प इत्यादी वापर करावा. नियमितपणे कोरफडीच्या एकपानाचा गर घ्यावा. चांगल्या दर्जाच्या काळ्या मनुका नियमितपणे रोज 30-30 या हिशेबात घ्याव्यात. सफरचंद, पोपई, डाळिंब अशी फळे आलटून पाटलटून वापरात असावी.
चांगल्या दर्जाचा खजूर स्वच्छ धुवून खावा. स्वच्छतेचे कटाक्षाने नियम पाळून तयार केलेला गव्हांकुरांचा रस किमान एक महिनाभर घ्यावा वेळेत पुरेसा व्यायाम पुरेसा आहार आणि पुरेेशी विश्रांती असा दिनक्रम कटाक्षाने राबवावा. तंबाखू, मरोरी, धूम्रपान, मद्यपान यापासून लांब राहावे. शंकास्पद बाहेरचे अन्न, बेकरी पदार्थ, मांसाहार आणि जागरण कटाक्षाने टाळावे.
ग्रंथोक्त उपचार : च्यवनप्राश, धात्रीरसायन, सप्तामृत लोह, चंद्रप्रभा, बृहतवाताचिंतामणी, वसंतकुसुमाकर, ताप्यदि लोह.
विशेष दक्षता आणि विहार : वेळेत नाष्टा आणि दोन वेळेचे जेवण. सकाळी आणि रात्री जेवणानंतर फिरावयास जाणे.
पथ्य : ताजे आणि घरगुती अन्न वेळेवर घेणे. आर्थिक परिस्थितीला धरून योग्य तो फलहार : सुकामेवा, विविध प्रकारची टरफलासकट
कडधान्ये; पुदिना, आले लसूण, ओली हळद अशी चटणी, हातसडीचा तांदूळ, मूग, उडीद, राजमा अशांच्या उसळी रात्री खाणे. ओलेखोबरे, शेंगदाणे इत्यादी सुयोग्य वापर.
कुपथ्य : शंकास्पद पाणी, अन्न, शिळे अन्न, बेकरीपदार्थ, फास्टफूड, डालडा मिठाई, चॉकलेट, बिस्कीट इत्यादी परान्न रात्री उशिरा म्हणजे राक्षसकाली भाजन.
योग्य व्यायाम : शारीरिक क्षमतेनुसार योग्य ती आसने; किमान 6 ते 12 सूर्यनमस्कार, दीर्घश्वसन, प्राणायाम.
रुग्णालयीन उपचार : तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते शोधन करून घेऊन ग्रंथोक्त रसायन प्रयोग करून घेणे आठवड्यातून एकमेवळ निरूहबस्ती.
अन्यषष्ठि उपक्रम (पंचकर्मादि) : स्वत:च्या हाताने सकाळी अंघोळी अगोदर अभ्यंग.
चिकित्साकाल : किमान तीन महिने
निसर्गोपचार : सकाळ सायं फिरून येणे. दीर्घश्वसन आणि प्राणायामाचा नियमित वापर, दुपारची झोप टाळणे सात्त्विक वेळेवर आहार.
कुमारी आसव, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादिवटी, आम्लपित्त टॅबलेट यांचा तारतम्याने; कमी प्रमाणात पण नियमिपणे वापर.तोंडाला अन्नाच रूची रहावी म्हणून पिप्पलादि काढा आमलक्यादि चूर्ण यांचा एकवेळ वापर.
या विकाराच्या मूळ कारणांचा मागोवा घेऊन तशी कारणे पुन्हा पडू नयेत याकडे लक्ष असावे. विविध प्रकारची व्यसने, वाईट सवयी, कदान्न, खराब आणि दूषित पाणी, अकारण उपासमार, झोपेचा अभाव अशा गोष्टी टाळाव्यात.
वैद्य विनायक खडीवाले