plants to remove bad luck and attract money
पुढारी ऑनलाईन :
Plant Vastu : तुमच्या घरात पैसा टिकत नाही का? वास्तुशास्त्रानुसार या ५ वनस्पती केवळ गरिबी दूर करत नाहीत, तर योग्य दिशेत ठेवल्यास उत्पन्नाचे नवीन मार्गही उघडतात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चमत्कारी वनस्पती.
धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा शांततेचा शोध घेत असतो. हीच शांतता मिळवण्यासाठी अनेक जण घरात विविध झाडे लावतात. मात्र माहितीअभावी प्रत्येक झाड शुभ नसते, हे अनेकांना ठाऊक नसते. वास्तुशास्त्रानुसार, निसर्गात प्रत्येक समस्येचे समाधान आहे, फक्त निवड योग्य असायला हवी.
आपण अनेकदा कोणतेही झाड घराच्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवतो. पण वास्तुमध्ये दिशेची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जाते. चुकीच्या दिशेत ठेवलेले मौल्यवान झाडही तणाव निर्माण करू शकते, तर योग्य दिशेत ठेवलेले छोटेसे रोप तुमचे नशीब उजळवू शकते. घरात सुख, शांती आणि धनवृद्धी हवी असेल, तर ही झाडे योग्य दिशेत जरूर लावा.
१. तुळस
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. ज्या घराच्या अंगणात तुळस हिरवीगार असते, त्या घरात वास्तुदोष राहत नाहीत, असे मानले जाते. तुळस नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. ती केवळ ऑक्सिजनचा स्रोत नाही, तर मानसिक शांततेसाठीही लाभदायक मानली जाते.
२. मनी प्लांट
नावाप्रमाणेच मनी प्लांटचा संबंध धनाशी जोडला जातो. वास्तु तज्ज्ञांच्या मते, हा रोप आग्नेय दिशेत ठेवल्यास आर्थिक स्थैर्य वाढते. त्याच्या वेली जमिनीला स्पर्श होणार नाहीत, याची काळजी घ्यावी आणि त्या नेहमी वरच्या दिशेने वाढू द्याव्यात.
३. शमीचे झाड
शनीदेव आणि महादेवांना प्रिय असलेले शमीचे झाड विजय आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. हे झाड घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अशा प्रकारे लावावे की बाहेर जाताना ते उजव्या हाताच्या बाजूला दिसेल. व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी हे शुभ मानले जाते.
४. लकी बांबू
फेंगशुई आणि वास्तु दोन्हीमध्ये बांबूचे रोप अत्यंत शुभ मानले जाते. हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. घराच्या हॉलमध्ये पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यास सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते, असे मानले जाते.
५. अपराजिता
निळ्या फुलांची अपराजिता वेल ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. ती उत्तर किंवा ईशान्य दिशेत लावल्यास घरात भरभराट टिकून राहते. तिची फुले शुक्रवार किंवा शनिवारी भगवान विष्णूंना अर्पण करणे शुभ मानले जाते.
६. स्नेक प्लांट
आजच्या प्रदूषणयुक्त वातावरणात स्नेक प्लांट अत्यंत उपयुक्त मानला जातो. हा रोप रात्रीसुद्धा ऑक्सिजन सोडतो. वास्तुनुसार, तो घराच्या दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवल्यास मानसिक तणाव आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निर्माण होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात व घरात शांततेचे वातावरण निर्माण होते.
वास्तू शास्त्रानुसार या झाडांमुळे समृद्धी येते असे म्हटले आहे. ही माहिती इंटरनेटवरून मिळाली असून ती लोकांपर्यंत पोहोचविणे इतकाच वरील माहितीचा उद्देश आहे. वाचकांनी तज्ञांचा सल्ला घेउनच निर्णय घ्यावा..