बोट ॲब्‍युलन्सच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विजयकुमार गावित, डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित व अन्य  Pudhari Photo
अपडेट्स

नंदुरबार : नर्मदा काठावरील गावांच्या सेवेत नवीन ‘बोट ॲम्बुलन्स’ दाखल

Nandurbar News | सुप्रिया गावित यांच्या हस्ते लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवीन नवीन बोट ॲम्बूलन्स जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून या बोटीचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते १६ जानेवारी रोजी करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.

याविषयी अधिक माहिती अशी की, नर्मदा काठावरच्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगावच्या अतिदुर्गम भागातील अनेक गावांमधील दळणवळण पाण्यात चालणाऱ्या बोटींवर अवलंबून असते. त्या भागातील गावांना पुरेशी सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून खासदार असताना डॉ. हिना गावित यांनी केंद्रस्तरावर तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून डॉ. सुप्रियाताई गावित यांनी संबंधित विभागांना पत्र व्यवहार केला होता. त्या प्रयत्नामुळे सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला. त्यातूनच ही नवीन स्पीड बोट नर्मदा काठावरील गावांच्या सेवेत दाखल झाली आहे.

नर्मदा काठावर कार्यरत असलेल्या बार्ज आणि बोट पेक्षा ही नव्याने दाखल झालेली स्पीड बोर्ड जलद गतीने सेवा देणार असून 33 गावांना याचा लाभ होईल. स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून भूषा गावाला बोटीतून यापूर्वी सहा तास लागायचे त्या ऐवजी नव्या स्पीडबोटमुळे अवघ्या दोन तासात हे अंतर कापता येणार आहे. अशी माहिती याप्रसंगी डॉ. सुप्रिया गावित यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT