Viral Video file photo
अपडेट्स

Viral Video: "दादा, गोळी चालवू नको!" भाऊ ओरडत होता, पण...; कॅमेऱ्यासमोर स्वतःवर झाडली गोळी

Delhi man shoots himself on camera: एका २८ वर्षीय तरुणाने स्वतःच्या छातीवर पिस्तुल टेकवून ट्रिगर दाबला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मोहन कारंडे

Viral Video Delhi man shoots himself on camera

नवी दिल्ली: “दादा, गोळी चालवू नकोस” असे चुलत भाऊ सांगत होता. “अरे, नको!” असे ओरडून त्याने थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, काही क्षणांतच २८ वर्षीय तरुणाने स्वतःच्या छातीवर पिस्तुल टेकवून ट्रिगर दाबला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा भागात ही थरारक घटना घडली. हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ही घटना उघडकीस आली. वसुंधरा एनक्लेव्ह येथील धर्मशिला रुग्णालयातून न्यू अशोक नगर पोलीस ठाण्याला एका व्यक्तीला गोळी लागल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली असता, पवन कुमार (वय २८) याला बेशुद्धावस्थेत दाखल केल्याचे समोर आले. पवनच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

व्हिडिओमध्ये काय आहे?

पवन कुमार हा त्याचा चुलत भाऊ हिमांशू याच्यासोबत होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पवन पिस्तुलमध्ये मॅगझिन लोड करताना दिसत आहे. हिमांशू त्याला पिस्तुल कशी हाताळायची हे सांगत होता आणि चुकूनही गोळी चालवू नको, असेही सांगत होता. परंतु, अचानक पवनने पिस्तुल आपल्या छातीला लावले, एकदा कॅमेऱ्याकडे पाहिले आणि स्वतःवर गोळी झाडली. गोळी लागताच पवन जमिनीवर कोसळला, हे पाहून व्हिडिओ करणाऱ्या हिमांशूच्या पायाखालची जमीनच सरकली.

प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, ज्या पिस्तुलमधून गोळी झाडली गेली ती हिमांशूची परवानाधारक पिस्तुल होती. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल, १० जिवंत काडतुसे, व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी न्यू अशोक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पवनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT