Fake Salary Scale  file photo
अपडेट्स

Fake Salary Scale | बनावट कागदपत्रांद्वारे वेतन लाभ, 11 शिक्षकांवर गुन्हा

Fake Salary Scale | शिक्षकांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू असतानाच देवळाली कॅम्प येथील डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमधील वेतननिश्चितीचा गैरप्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक / देवळाली कॅम्प :
शिक्षकांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू असतानाच देवळाली कॅम्प येथील डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमधील वेतननिश्चितीचा गैरप्रकार समोर आला आहे.

बनावट कागदपत्रे तयार करत वेतननिश्चिती करून घेत संस्था तसेच शासनाची फसवणूक केल्याबाबत ११ शिक्षकांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन राजलदास चावला यांच्या फिर्यादीनुसार, डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमध्ये २००१ ते २०२२ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वेतननिश्चितीसाठी जिल्हा परिषद तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे अधिकृत पत्रव्यवहार किंवा मान्यता ठराव सादर केलेला नसतानाही संबंधित शिक्षकांनी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.

त्याआधारे वेतननिश्चिती करून घेतल्याने संस्था व शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी फसवणूक व गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक पाडेकर तपास करत आहेत.

गुन्हा दाखल शिक्षक

पूनम समीर मुखर्जी, प्रज्ञा नितीन राजे, मनमोहन श्याम हेमनानी, लक्ष्मण यशवंत मुसळे, विश्वंभरी पंजूमल दौलतानी, प्रियंका विजय आहुजा, सविता अर्जुनसिंग अडवाणी, भाग्यश्री संजय हिरे, सरयू प्रकाश कुलकर्णी, शोभा तानाजी दुमणे, सुजाता श्रीकृष्ण ठाकूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT