अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ ट्रस्टकडून होत असलेल्या महाप्रसाद सेवेबरोबरच समर्थ महाप्रसाद सेवादेखील निराधार लोकांना मोठी आधार देणारी सेवा असल्याचे मनोगत पुणे येथील स्कोडा कंपनीचे मॅनेजर प्रसाद डुकरे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, पुरोहित विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला, त्यावेळी प्रसाद डुकरे हे बोलत होते.
प्रसाद डुकरे पुढे बोलताना म्हणाले, अन्नछत्र मंडळाचा परिसर हा सकारात्मक ऊर्जा देणारा असून समाधानी वातावरण असल्याचे म्हणाले. याप्रसंगी पुणे येथील उद्योजक अण्णा वाल्हेकर, निलेश पवार (सरपंच, निघोजे), बाबासाहेब येळवंडे (स्कूल कमिटी अध्यक्ष), ज्ञानेश्वर आल्हाट, विजय येळवंडे यांच्यासह स्वामीभक्त, स्वामीसेवक उपस्थित होते. यावेळी अक्कलकोट अन्नछत्र मंडळातील
पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वामीभक्त उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ ट्रस्टकडून होत असलेल्या महाप्रसाद सेवेबरोबरच समर्थ महाप्रसाद सेवादेखील निराधार लोकांना मोठी आधार देणारी सेवा असल्याचे मनोगत पुणे येथील स्कोडा कंपनीचे मॅनेजर प्रसाद डुकरे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, पुरोहित विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला, त्यावेळी प्रसाद डुकरे हे बोलत होते.
प्रसाद डुकरे पुढे बोलताना म्हणाले, अन्नछत्र मंडळाचा परिसर हा सकारात्मक ऊर्जा देणारा असून समाधानी वातावरण असल्याचे म्हणाले. याप्रसंगी पुणे येथील उद्योजक अण्णा वाल्हेकर, निलेश पवार (सरपंच, निघोजे), बाबासाहेब येळवंडे (स्कूल कमिटी अध्यक्ष), ज्ञानेश्वर आल्हाट, विजय येळवंडे यांच्यासह स्वामीभक्त, स्वामीसेवक उपस्थित होते. यावेळी अक्कलकोट अन्नछत्र मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वामीभक्त उपस्थित होते.