Latest

प्रिया बेर्डे, अलका कुबल यांच्यासह १५ जणांवर ठपका, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी अध्यक्ष, संचालकांकडून 10 लाख वसूलीचे आदेश

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'मानाचा मुजरा' कार्यक्रमातील अनियमित खर्चाला जबाबदार धरून मुंबई उच्च न्यायालयाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष व माजी संचालक अशा पंधरा जणांवर ठपका ठेवत 10 लाख 78 हजार 593 रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम सहा आठवड्यांत जमा करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

पुणे येथे 2012-13 दरम्यान झालेल्या 'मानाचा मुजरा' या कार्यक्रमासाठी तत्कालीन संचालकांनी 52 लाख रुपये खर्च केले होते. सर्वसाधारण सभेत या खर्चाला मान्यता मागितली असता याला सभासदांनी आक्षेप घेतला होता. जे खर्च चुकीच्या पद्धतीने झाले आहेत, त्याची वसुली झाली पाहिजे, अशी मागणी केली. काही सभासदांनी कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक् त कार्यालयात तक्रार दाखल केली. यावर निर्णय झाला; पण टंकलेखनाची चूक झाल् याने तत् कालीन संचालकांनी रक् कम भरली नव् हती. याप्रकरणी महामंडळाचे तत् कालीन अध् यक्ष मेघराज भोसले यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर चॅरिटी कमिशनर यांनी टंकलेखनाची चूक सुधारून नव्याने आदेश काढून उपरोक्त रक्कम भरण्याचा आदेश दिला. परंतु, यावेळी दंडाची रक् कम निश्चित झालेल्या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत उच्च न्यायालयाने खर्चातील अनियमिततेवर ताशेरे ओढत सहा आठवड्यांत ही रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले.

माजी अध्यक्ष, संचालक असे…

माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय कोंडके, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, माजी खजिनदार सतीश बिडकर, माजी
कार्यवाह सुभाष भुरके, माजी सहखजिनदार अनिल निकम, माजी सहकार्यवाह संजीव नाईक, माजी संचालक सतीश रणदिवे, प्रिया बेर्डे,
अलका कुबल, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती व प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT