Latest

अँटिबॉडी कॉकटेल थेरपी कोणासाठी?

Arun Patil

कोरोना रुग्णांसाठी आता 'अँटिबॉडी कॉकटेल' थेरपी एक प्रभावी उपचार ठरत आहे. अतिजोखमीच्या कोरोना रुग्णांना 'कासिरिविमॅब' (600 एमजी) आणि 'इम्डेविमॅब' (600 एमजी) या दोन्ही औषधांचे गुण असलेले औषध दिले जाते. हे औषध इंजेक्शनद्वारे दिले जाते. अँटिबॉडी कॉकटेल चे संपूर्ण डोस 30 मिनिटांत रुग्णाला दिले जातात. त्यानंतर एक तास रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येते. या औषधांमुळे कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत पटकन सुधारणा होत आहे.

थेरपी कुणासाठी?

– कोव्हिड-19 चे रुग्ण प्रौढ आणि 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे दाखवतात आणि सुमारे 40 किलो वजनाचे ज्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह असेल आणि त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची तसेच ऑक्सिजनची गरज नाही, त्यांच्याकरिता ही थेरेपी उपयुक्त ठरते.

– 60 वर्षांवरील व्यक्ती ज्यांना उच्च रक्तदाब किंवा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी किंवा दीर्घकाळ फुप्फुसाचा आजार अथवा दीर्घ श्वसन रोग आहे.

– ज्यांना जन्मजात किंवा अधिग्रहित हृदयरोग/ सिकल सेल रोग/ न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर जसे सेरेब्रल पाल्सी किंवा गॅस्ट्रोस्टॉमी किंवा ट्रेकेओस्टोमी किंवा दमा किंवा दुसरा दीर्घ श्वसन रोग आहे.

– मधुमेह
– लठ्ठ व्यक्ती
– किडनी रोग असलेली व्यक्ती
– ज्यांना कर्करोग, सिकल सेल एनिमिया, अवयव प्रत्यारोपण, थॅलेसेमिया, एचआयव्ही किंवा रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता आहे.
– इम्युनोसप्रेसिव्ह उपचारांवर
– उच्च रक्तदाब
– दमा

ही थेरपी कोणासाठी योग्य नाही?

कोव्हिड-19 संसर्गामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या ज्यांना ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता आहे, ज्याच्यामध्ये कॅसिरिविमॅब आणि इमदेविमाब वापरले जाऊ शकत नाहीत त्यांना या थेरपीचा वापर करता येणार नाही. या थेरपीद्वारे उपचार घेतलेल्या रुग्णांनी विलगीकरणाचे पालन करणे हात स्वच्छ करणे, मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या खबरदार्‍या घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT