Latest

Zika Virus : ३८ गावांत ‘झिका’चा धोका; मिरज तालुक्यात सर्वाधिक गावे

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात झिका पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 38 गावे जोखीम म्हणून निश्चित केली आहेत. या गावांत धूरफवारणी, सर्वेक्षणासह इतर उपाययोजना सुरू केल्या आहेत. लोकांनी घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी. तसेच गर्भवतींची विशेष काळजी घ्या, असे आव्हान जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केले आहे. (Zika Virus)

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत झिकाचा प्रसार सुरू होता. शेजारी असणार्‍या कोल्हापूरमध्ये रुग्ण आढळत आहेत. मात्र रविवारपर्यंत जिल्ह्यात एकही झिकाचा रुग्ण नव्हता. मात्र सोमवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. (Zika Virus)

झिका हा एडीस डासामुळे होतो. याच डासामुळे डेंग्यू आणि चिकुनगुन्याची लागण होते. हा डास जिल्ह्यातील अनेक भागांत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वी डेंग्यू, चिकुनगुन्या अशा आजारांचे रुग्ण जास्त आढळेली 38 गावे जोखमीची म्हणून निश्चित करण्यात आली आहे. त्यागावांमध्ये स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच धूरफ वारणी सुरू करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

जोखमीची गावे…

मिरज ः बेडग, माधवनगर, सावळी, एरंडोली, नरवाड, नांद्रे, विजयनगर, मौजे
डिग्रज, बामणोली, सोनी, सलगरे, हरिपूर, भोसे, सुभाषनगर, ढवळी, इनाम-धामणी.
कवठेमहांकाळ ः कवठेमहांकाळ, इरळी, आगळगाव, थबडेवाडी.
जत ः धावडवाडी, तिल्याळ, काराजनगी, सोन्याळ,
मुचंडी, जत.
पलूस ः भिलवडी.
आटपाडी ः आटपाडी, कोळे.
वाळवा ः तांदुळवाडी, शिरगाव, इस्लामपूर.
कडेगाव ः आसद, नेवरी.
तासगाव ः विसापूर, नरसिंहवाडी, निंबळक.

प्रतिबंधासाठी हे करण्याची गरज…

पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या टाकीत एक दिवस पाणी न भरता कोरडा दिवस पाळा, परिसरात निरुपयोगी वस्तूंची साठवणूक करू नका, परिसर स्वच्छ ठेवा, पाण्याच्या टाकीवर घट्ट झाकण घाला, खिडक्यांना जाळी बसवा, डबक्यात गप्पी मासे सोडा, गरज भासल्यास धूरफ वारणी करावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले.

लक्षणे सौम्य; मृत्यूचे प्रमाण कमी

ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा, डोकेदुखी अशी सौम्य स्वरूपाची लक्षणे असतात. लक्षणे दोन ते सात दिवस राहतात. आजाराची लागण झाल्यास रुग्णालयामध्ये दाखल करण्याची फ ारशी आवश्यकता लागत नाही. तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याची माहिती यंत्रणेकडून देण्यात आली. (Zika Virus)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT