पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चहल हे आडनाव काढून टाकले होते. दुसरीकडे, चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते, 'न्यू लाइफ लोडिंग' चहलची पोस्ट आणि धनश्रीचे आडनाव काढून टाकल्यानंतर, हे जोडपे लवकरच वेगळे होणार असल्याची चर्चा सुरू झाली, परंतु नंतर चहल आणि धनश्री दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे हे एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे जग जाहीर झाले. स्वत: चहलने या प्रकरणी मौन तोडून आमच्या दोघांमध्ये सर्व काही ठिक असल्याचा खुलासा केला होता.
आता याप्रकरणी मौन तोडत धनश्रीने (Dhanashree Verma) इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या पायाच्या दुखापतीबद्दल माहिती देत कुटुंबातील सदस्य आणि चहलचे आभार मानले आहेत.
धनश्रीने (Dhanashree Verma) तिची पोस्ट शेअर करताना एक भावनिक नोट लिहिली आहे. यात ती म्हणते की, गेल्या वेळी रीलचे शूटिंग करताना माझ्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे बरेच दिवस मी डान्स केला नाही. यामुळे मी खूप अस्वस्थ होते. मी आत्मविश्वास गमावला होता, पण माझा पती युजवेंद्र चहल आणि जवळच्या मित्रांमुळे मी पूर्णपणे बरी झाली आहे. या सर्वांचे खूप खूप आभार!'
लिगामेंटच्या दुखापतीमुळे धनश्रीला (Dhanashree Verma) विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यावर स्वत: धनश्रीने माहिती दिली की, 'जर मला आयुष्यात पुन्हा डान्स करायचा असेल तर त्यासाठी मला सर्जरी करावी लागेल. माझ्यासाठी हा कठीण काळ होता, पण यादरम्यान माझ्या आणि युजझवेंद्रच्या नात्याबद्दल अनेक उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्या पाहून मला खूप वाईट वाटले.'
धनश्री म्हणते की, 'दुखापत आणि अफवा या दोन्ही घटनांनी मला बळकटी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी मी मजबूत झाली आहे. मला समजले की लोकं नेहमी तुमच्याबद्दल काहीना काही बोलत राहणार, पण हीच गोष्ट मी माझ्यासाठी सामर्थ्य बनवण्याचे ठरवले आहे.' इन्स्टावरील नोट पूर्ण केल्यानंतर धनश्रीने सासरचे चहल हे आडनाव आपल्या नावासोबत जोडले. तिने पोस्टमध्ये धनश्री वर्मा चहल असे लिहिले, ज्यावरून स्पष्ट दिसून येते की दोघांमध्ये सर्व काही ओके सुरू आहे. धनश्रीच्या या पोस्टवर युजवेंद्र चहलनेही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या कमेंटमधून तो धनश्रीला प्रोत्साहन देताना दिसतोय.