Latest

‘फादर्स डे’ च्या दिवशी युवराज सिंगने दाखवली बाळाची झलक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल किच यांनी 'फादर्स डे'चे औचित्य साधून आपल्या बाळाचे नामकरण केले आहे. त्यांचा मुलगा ओरियन किच सिंग नावाने ओळखला जाणार आहे. युवीने सोशल मीडियावर बाळाचा फोटो पोस्ट करून ही माहिती दिली आहे. 30 डिसेंबर 2016 रोजी युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल किच यांचा विवाह झाला होता. लग्‍नानंतर हेजल चित्रपटसृष्टीत जास्त अ‍ॅक्टिव्ह दिसली नाही. 25 जानेवारी 2022 या दिवशी युवी व हेजल यांना पुत्रप्राप्‍ती झाली.

युवराज सिंगने बाळाच्या नामकरणाबाबत खुलासा केल्यानंतर चाहत्यांकडून आणि माजी क्रिकेटपटूंकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने आणि अभिनेता अभिषेक बच्चननेही युवराज सिंगला याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. युवराज आणि हेजल 30 नोव्हेंबर 2016 ला विवाहबंधनात अडकले होते. तर यावर्षीच्या जानेवारी (2022) महिन्यातचं युवराज सिंगला मुलगा झाला होता.

भारतासाठी युवराज सिंगने ३०४ एकदिवसीय सामने तर ५८ टी-२० सामने खेळले आहेत. युवराजने एकदिवसीय सामन्यात ८७०१ धावा केल्या तर १११ विकेट्स घेतल्या आहेत. युवराज सिंगला कसोटी सामने खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. पण तरीही, युवराजने ४० कसोटी सामने खेळले आहेत. युवराज सिंग २००७ आणि २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. भारताला विश्वचषक जिंकवून देण्यासाठी त्याने महत्वपुर्ण कामगिरी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT