file photo 
Latest

दुर्दैवी ! स्पीड ब्रेकरवर रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रिक्षाचालकाच्या बेदरकारपणामुळे तरुणीला जीव गमवावा लागला आहे. स्पीड ब्रेकरवर रिक्षाचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना 15 जुलैला रात्री दोनच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसरातील नवशा मारुती मंदिर परिसरात घडली. सपना राम राठोड (वय 30, रा. जांभूळवाडी रस्ता) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई रंजनाबाई (वय 50) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार किरण सुरवसे (वय 32, रा. कामठेवस्ती) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना 15 जुलैला रात्री दोनच्या सुमारास रिक्षातून डेक्कन परिसरात जेवण करण्यासाठी जात होती. त्या वेळी रिक्षाचालक सुरवसे याने नवशा मारुती मंदिर परिसरात स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे रिक्षातून खाली पडल्यामुळे सपना गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT