Latest

Yearly Horoscope 2023 : मकर : संयमाची कसोटी पाहणारे वर्ष

दिनेश चोरगे
  • होराभूषण : रघुवीर खटावकर

मकर राशीत उत्त्तरषाढा 2,3,4 चरणे (पृथ्वी तत्व) श्रवण नक्षत्र (पृथ्वी तत्व) धनिष्ठा नक्षत्र 1 ले व 2 रे चरण (पृथ्वी तत्व) अशी नक्षत्रे आहेत. मकक्षर रास पृथ्वी तत्वाची आहेत पण त्यातील सर्व नक्षत्रे ही पृथ्वी तत्वाची आहेत. अशी ही एक वैशिष्ट्यपूर्ण रास आहे.

मकर राशीच्या व्यक्तींना श्रमाची व पैशाची खरी किंमत समजत असते. या राशीच्या व्यक्ती एखाद्या क्षेत्रात प्रवेश केल्यावर फक्त आपल्या कष्टाच्या जोरावर आपली लायकी वाढवून इतरांच्या केव्हा पुढे जातात हे कोणाला ही समजत नाही. मकर राशीत स्वामी शनी असल्यामुळे आपल्या कामाची बढाई हे मारत नाहीत. उगाच भपकेबाजपणा यांच्याकडे नसतो. या राशीच्या बर्‍याच व्यक्ती 'साधी राहणी व उच्च विचारसरणी' या उक्तीला आचरणात आणणार्‍या असतात. भारताची ही मकर राशी असल्यामुळे भारतात मकर राशीच्या व्यक्ती बलवान असतात. मंगळासारखा बलाढ्य ग्रह या मकर राशी उच्च फले देतो. कारण तो भूमिपुत्र आहे. यावर्षी 17 जानेवारी 2023 रोजी शनी (मकरराशी स्वामी) कुंभ राशीत प्रवेश करेल. मकर राशीसाठी हा शनी सुवर्णपादाने येत असल्यामुळे काही प्रमाणात चिंता निर्माण करणारा आहे.

कुंभेतील हा शनी पुढे अडीच वर्षे याच राशीत राहील. मकर राशीच्या दुसर्‍या स्थानी असलेला हा शनी धन नाश व सौख्य हानी करणारा आहे. तरीही तो स्वराशीत असल्यामुळे कौटुंबिक सौख्य टिकवून ठेवेल. तो प्रथमच द्वितीय स्थानांचा स्वामी धनस्थानी असल्यामुळे धनप्राप्तीही मोठ्या प्रमाणात होईल. साडेसातीची तीव्रता शनी स्वराशीत व मूळत्रिकोण राशीत असल्यामुळे कमी भासेल.
या वर्षी नेपच्यून 18 फेब्रुवारी 2023 रोजी मीन राशीत प्रवेश करेल. मकर राशीसाठी नेपच्यून सुवर्णपादाने येणार असून चिंता निर्माण करणारा आहे. नेपच्यून मीन राशीत 14 वर्षे रहाणार आहे. तो मकर राशीच्या तृतीयस्थानातून भ्रमण करणारा आहे. कल्पनाशक्ती उत्त्तम देईल. भावंडांबद्दल संवेदनशील राहाल.

या वर्षी गुरू 21 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत प्रवेश करील. तो मकर राशीसाठी लोहपादाने येणार असून अधिक कष्ट करायला लावेल.
मकर राशीला मेेषेतील गुरू चौथा राहील हा गुरू शत्रू वाढवेल. नातेवाईक भावंडे यांच्यावर विसंबून राहून चालणार नाही. फसवणूक होऊ शकेल, पण निर्णायक सर्व कामात यश मिळेल.
21 एप्रिल 2023 पर्यंत गुरू राशीला 3रा असताना नेहमीपेक्षा प्रत्येक कामात जास्त कष्ट घ्यावे लागतील. जवळच्या व्यक्तींचा विरह सहन करावा लागेल. मेषेत 21 एप्रिल नंतर गुरूबरोबर राहू व हर्षलही रहाणार आहेत. राहू केतू घरगृहस्थीत व धंदा व्यवसायाच्या ठिकाणी शत्रू निर्माण करतील.

मकर राशीला रवी 3 रा मीनेत (मार्च-एप्रिल), 6 वा मिथुनेत (जून-जुलै) व 10 वा 11 वा तूळेत वृश्चिकेत (ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर) महिन्यात नेहमीच उत्तम फळे देतो व सर्व कामात यश देत असतो. या काळात व्यक्ती आहे त्या साधन सामुग्रीतून विकासासाठी उपाययोजना करू शकते. एखादी संधी कमी श्रमात लाभते. कार्यसिद्धी होऊन मोबदला मिळतो.

मकर राशीला रवी चौथा मेषेत (एप्रिल-मे), 8 वा सिंहेत(ऑगस्ट-सप्टेंबर) 12 वा धनुत (डिसेंबर-जानेवारी) असताना गृहसौख्याची काळजी राहते. धंदा व्यवसायात मंदी जाणवते. धंद्यातील स्पर्धा वाढते. आर्थिक नुकसान होते. मोठे खर्च निघतात. यावर्षी मंगळ वृषभ ते मकर या राशीतून भ्रमण करेल. कर्क व बिघडवणारे राहील. याकाळात अपघात होणार नाही याची काळजी घ्या. अपमानाचे प्रसंग येतील. शुक्राचे मिथुन-कर्क राशीतील भ्रमण (मे-जून) भावनिक दडपण निर्माण करणारे राहील. शुक्राचे तूळ राशीतील भ्रमण (नोव्हेंबर-डिसंबरे) चालू असताना धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठे नुकसान होऊ शकेल.

प्लुटो वर्षभर मकर राशीत राहील. तुमचे विचार क्रातिकारक असतील. ते इतरांच्या पचनी पडणार नाहीत. वैवाहिक जीवनातसुद्धा भावनिक दडपण राहील. एकंदरीत पाहता तुमच्या संयमाची कसोटी पाहणारे हे वर्ष राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT