Latest

यवतमाळ : बाजार समिती संचालकाची गोळ्या झाडून हत्या

backup backup

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच भांबराजा येथील सरपंच महिलेचे पती असलेल्या शिवसैनिकावर गुरुवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून कुऱ्हाडीचे घाव घातले. या हल्ल्यात संचालक सुनील नारायण डिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. भांबराजा येथे झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुनील डिवरे हे गुरुवारी सायंकाळी यवतमाळवरून भांबराजा येथे परतले. घराच्या अंगणात बसलेले असताना दुचाकीवरून तीन जण आले. त्यापैकी एकाने दुचाकी सरळ करून ठेवली. उर्वरित दोघांनी डिवरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. नंतर कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर घाव घातले. काही कळायच्या आत हे हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. यावेळी आरडाओरडा ऐकून डिवरे यांच्या पत्नी अनुप्रिया घरातून अंगणात धावत आल्या. सुनील डिवरे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. हा सर्व घटनाक्रम ७.३० वाजताच्या दरम्यान घडला. सरपंच अनुप्रिया यांनी आरडाओरडा करीत मदतीसाठी धावा केला. ग्रामस्थ तत्काळ जमा झाले. सुनील डिवरे यांना शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सुनील डिवरे हे बाजार समितीचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी अनुप्रिया या भांबराजा येथील सरपंच आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुनील डिवरे यांनी एकहाती सत्ता काबीज केली होती. तेव्हापासून त्यांची राजकीय वर्तुळात दखल घेतली जात होती. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी डिवरे यांचा गावातील विरोधी गटासोबत मोठा वाद झाला होता. सातत्याने डिवरे व त्यांच्या विरोधीगटात संघर्ष होत होता.

मारेकरी गावातील सुनील डिवरे यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या तिघांनी सर्वप्रथम कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यानंतर त्याच्या पोटात बंदुकीतून गोळी झाडली. डिवरे जागेवरच गतप्राण झाल्याचे लक्षात येताच मारेकऱ्यांनी हवेतही राऊंड फायर करीत जल्लोष करून तेथून पळ काढला. हा सर्व घटनाक्रम डिवरे यांचा १५ वर्षाचा मुलगा दाराआडून बघत होता. मारेकरी हे गावातीलच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या भांडणातूनच हा वचपा काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

व्हिडीओ पहा – सर कटा सकते हैं लेकिन! देशसेवेसाठी हात, पाय गमावलेल्या सैनिकांचा थक्क करणारा पराक्रम

https://youtu.be/fw-3g-eGj0Y

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT