Latest

Yashasvi Jaiswal Home : ‘यश’ इम्पॅक्ट्..! यशस्वी जैस्‍वालने मुंबईत घेतले तब्बल ५ कोटींचे घर

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न घेवून मुंबईत आलेल्या यशस्वीला आझाद मैदानावरील झोपडीत रहावे लागले होते.  यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याला स्वत:च्या घरी नेले. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कधी काळी मुंबईत एका झोपडीत राहणाऱ्या यशस्वीने आता मुंबईत स्वताच्या हक्काचे घर घेतले आहे. त्याने मुंबईत ३ बीएचके फ्लॅट घेतला आहे. (Yashasvi Jaiswal Home)

भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने X BKC मध्ये सुमारे ५.४ कोटी रुपयांमध्ये १,१०० चौरस फुटांचा फ्‍लॅट विकत घेतला आहे. त्याने हा फ्लॅट वांद्रे (पूर्व) येथील इमारतीमध्ये घेतला आहे. याची नोंदणी दि. ७ जानेवारी रोजी झाली. यापूर्वी यशस्वी जैस्वालने ठाण्यात ५ बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. (Yashasvi Jaiswal Home)

एकेकाळी झोपडीत रहायचा जैस्वाल

यशस्‍वी जैस्‍वाल क्रिकेट खेळण्‍याचे स्वप्न घेवून उत्तर प्रदेशमधून मुंबईत आला. त्‍याला आझाद मैदानाच्या झोपडीत रहावे लागत होते. परिस्‍थितीशी संघर्ष करत त्याने कठोर परिश्रम घेतले. मुंबईमध्ये क्रिकेटचा सराव करत असताना तो पाणीपुरीची विक्री करायचा. अखेर त्‍याला कठाेर परिश्रमाचे फळ मिळाले. २०१९ मध्‍ये रणजी स्‍पर्धेसाठी त्‍याची निवड झाली. यानंतर त्‍याने मागे वळून पाहिले नाही. रणजी स्‍पर्धसह आयपीएलम स्‍पर्धेतही त्‍याने चमकदार कामगिरी केली. यानंतर त्‍याच्‍या टीम इंडियात निवड झाली.

जैस्वाल जबरदस्त फॉर्ममध्ये

जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावताना आपल्या डावात 12 षटकार ठोकले. कसोटी सामन्याच्या एका डावात इतके षटकार मारण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या आधी वसीम अक्रमनेही एका कसोटी डावात 12 षटकार ठोकले होते. यशस्वीने टीम इंडियासाठी आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांमध्ये 861 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने भारतीय संघासाठी 17 टी-20 सामन्यांमध्ये 502 धावा केल्या आहेत.

जैस्वालची शानदार कामगिरी

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुसरे द्विशतक झळकावले. त्याच्या या शानदार खेळीत विक्रमी 12 षटकारांचा समावेश होता. जैस्वालने यापूर्वी 2020 मध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत नाव कोरले होते. आयपीएलच्या 2023 हंगामात त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 14 सामन्यांमध्ये एकूण 625 धावा केल्या होत्या.

वेस्ट इंडिजविरुद्ध 'यशस्वी' पदार्पण

जैस्वालने 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शतक झळकावले. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजीचा नमुना सादर करत सलग दोन द्विशतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात 209 तर तिसऱ्या कसोटीत 214 धावांची खेळी केली.

कोहलीचा विक्रम निशाण्यावर

विराट कोहलीने 2011 मध्ये टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 26 षटकार मारले आहेत. दुसरीकडे, 22 वर्षीय यशस्वी जैस्वालने भारतीय संघासाठी आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांच्या 13 डावांमध्ये 25 षटकार ठोकले आहेत. यशस्वी ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो कोहलीचा विक्रम सहज मोडू शकतो. कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी त्याला फक्त दोन षटकारांची गरज आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT