Latest

तब्बल 100 कोटी रूपयांचे सँडल!

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली : हल्ली साध्याच वाटणार्‍या अनेक वस्तूंना मोठीच किंमत मिळत आहे. त्यामध्ये अगदी पेनापासून ते घड्याळापर्यंतच्या अनेक वस्तूंचा समावेश असतो. अर्थातच या वस्तू साध्याच वाटत असल्या तरी त्या रत्नजडीत किंवा मौल्यवान धातूंनी बनलेल्या असल्याने त्यांना अशी अव्वाच्या सव्वा किंमत येत असते. असाच एक सँडलचा जोड आहे ज्याची किंमत 100 कोटी रुपये इतकी आहे.

2019 मध्ये अँटोनियो व्हिएत्री या इटालियन डिझायनरने दुबईमध्ये या जगातील सर्वात महाग सँडलचे प्रदर्शन केले होते. हे चप्पल जगातील सर्वात मोठ्या इमारतीत म्हणजेच बुर्ज खलिफामध्ये ठेवण्यात आलं होतं. या सँडलचे नाव आहे 'मून स्टार शूज'. इटलीमध्ये बनवलेले, एमिराट्समध्ये डिझाइन केलेले हे सँडल मिड फॅशन वीकमध्ये लोकांसमोर आणले गेले.

30 कॅरेटचे हिरे, सँडलची टाच सोन्याची!

आता प्रश्न पडतो की, हे सँडल इतके महाग कसे आहेत? खरे तर, या सँडलमध्ये 30 कॅरेटचे हिरे जडलेले आहेत. सँडलची टाच सोन्याची आहे. एवढेच नाही तर 1576 मध्ये अर्जेंटिनामध्ये पडलेल्या उल्केपासून ते तयार करण्यात आले होते. अँटोनियो व्हिएत्रीने मौल्यवान गोष्टींपासून पादत्राणे बनवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 2017 मध्ये त्यांनी 24 कॅरेट सोन्यापासून जगातील पहिला बूट बनवला. जो ते विकत घेईल, त्यांना हेलिकॉप्टरने शूज पोहोचवले जायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT