पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या सुरु असलेल्या विश्वचषक सामन्यादरम्यान पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स मोफत मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशनकडून ही घोषणा करण्यात आली आहे. वानखेडेवर आत्तापर्यंत विश्वचषकातील २ सामने खेळवण्यात आले आहेत. (Wankhede Stadium)
उर्वरित विश्वचषकातील आणखी ३ सामने वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये सेमी फायनलचाही समावेश आहे. भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना २ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. प्रेक्षकांनी तिकिट दाखवताच कोल्ड्रिंक्स आणि पॉपकॉर्न 'वन टाईम' मोफत मिळणार आहे. (Wankhede Stadium)
याबाबत बोलताना महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अमोल काळे म्हणाले, "विश्वचषकातील सामने वानखेडे स्टेडियमवर पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना कोल्डिंक्स आणि पॉपकॉर्न वन टाईम मोफत देणार आहोत. सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी त्यांचे तिकीट काऊंटर वर दाखवावे यानंतर त्या तिकिटावर विशिष्ट मार्क केले जाईल आणि मोफत पॉपकॉर्न दिले जाईल. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन त्याचा खर्च उचलणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोत." (Wankhede Stadium)